घरताज्या घडामोडीऑक्सफर्डच्या तिसऱ्या फेजची चाचणी सुरु; ४३ स्वयंसेवकांची निवड

ऑक्सफर्डच्या तिसऱ्या फेजची चाचणी सुरु; ४३ स्वयंसेवकांची निवड

Subscribe

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली असून मुंबई महापालिकेने आतापर्यंत ४३ स्वयंसेवकांची निवड केली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर लस संशोधन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु केली आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ४३ स्वयंसेवकांची निवड केली आहे. त्यातील १२ जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

- Advertisement -

ऑगस्टमध्ये १०० मिलियन डोस देण्याच्या घोषणेनंतर हा विस्तार करण्यात आला असून आतापर्यंत एकूण भागीदारीद्वारे कोरोना लसीच्या २०० मिलियन डोसपर्यंत भागीदारी देण्यात येणार आहे, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) सांगितले आहे.

पुण्यातल्या ससून रुग्णालयात तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे. तर सिरम इन्स्टिट्यूट या लशीची निर्मिती करणार आहे. स्वदेशी लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेककडून दुसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे. तर झायडस कॅडिला तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे.

- Advertisement -

२०२१ च्या सुरुवातीला भारतात करोनावरील पहिली लस उपलब्ध होऊ शकते. मागच्या २४ तासात ८२ हजार १७० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार सोमवारी भारतात कोरोना रुग्णांचा आकडा ६० लाखाच्या पुढे गेला. तर भारतात सध्याच्या घडीला तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. – डॉ. हर्ष वर्धन

२४ तासांत ७० हजार ५८९ नव्या रुग्णांची वाढ

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६१ लाखांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांत ७० हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ७७६ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत ६१ लाख ४५ हजार २९२ इतके कोरोनाबाधित झाले असून यापैकी ९ लाख ४७ हजार ५७६ इतके अॅक्टिव्ह केसेस आहेत. तसेच आतापर्यंतच्या मृतांचा आकडा ९६ हजार ३१८ इतका झाला आहे. तर ५१ लाख ०१ हजार ३९८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाज शरीफ यांच्या बंधूना अटक 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -