Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Karnataka : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील डीके शिवकुमार यांचा पत्रकारांवर संताप; म्हणाले...

Karnataka : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील डीके शिवकुमार यांचा पत्रकारांवर संताप; म्हणाले…

Subscribe

कर्नाटक विधानसभेत २२४ पैकी १३५ जागा जिंकत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. आता काँग्रेस समोर आव्हान आहे ते मुख्यमंत्री कोणाला करायचे याचे. निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याचा पेच निर्माण झाला आहे. अशातच काँग्रसचे संकटमोचक डीके शिवकुमार हे या शर्यतीत प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पण काही मीडिया चॅनेल्सने त्यांच्याविरोधात बातम्या चालवल्याने ते चांगलेच भडकले आहेत.

कर्नाटक विधानसभेत २२४ पैकी १३५ जागा जिंकत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. आता काँग्रेस समोर आव्हान आहे ते मुख्यमंत्री कोणाला करायचे याचे. निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याचा पेच निर्माण झाला आहे. अशातच काँग्रसचे संकटमोचक डीके शिवकुमार हे या शर्यतीत प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पण काही मीडिया चॅनेल्सने त्यांच्याविरोधात बातम्या चालवल्याने ते चांगलेच भडकले आहेत. ‘त्या’ चॅनेल्सविरोधात आपण अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (D K Shivkumar Angry On Some Media Channels In Process Forming Government In Karnataka)

नेमके काय म्हणाले डी. के. शिवकुमार?

- Advertisement -

“जर कुठल्याही चॅनेलने मी राजीनामा दिल्याच्या बातम्या चालवल्या तर त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. काही माध्यमांनी अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या आहेत. माझा पक्ष म्हणजे माझी आई आहे. माझे हायकमांड, माझे आमदार, माझा पक्ष तिथे आहे. त्याचबरोबर काही दावा करणारे जी. परमेश्वर यांचे समर्थकही बनले आहेत. त्यांनीही आंदोलन सुरु केले आहे. जर पक्षाच्या हायकमांडंनं आम्हाला सरकार चालवायला सांगितलं तर आम्ही याची जबाबदारी घेतो, असे त्यांनी म्हटले तसेच, जर हायकमांडची इच्छा असेल तर मी सरकारची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी नुकतंच म्हटले होते. दरम्यान, दलित समाजातील मुख्यमंत्री व्हायला हवा”, असे डी. के. शिवकुमार यांनी म्हटले.

डी. के. शिवकुमार हे मंगळवारी आपला भाऊ आणि काँग्रेस नेते डीके सुरेश यांच्यासह दिल्लीत गेले. त्यावेळी त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेटही घेतली. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील एक चर्चेतील नाव असून दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाचीही चर्चा आहे.

- Advertisement -

दरम्यान, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी १३५ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर ६६ जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं. जेडीएसला १९ अपक्षांना २ जागा तर इतर पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असल्यानं काँग्रेसला इथं स्पष्ट बहुमत मिळालं आहे.


हेही वाचा – IMD म्हणते, मान्सूनला चार दिवस होणार उशीर; स्कायमेटच्या अंदाजानंतर वर्तवली शक्यता

- Advertisment -