घरताज्या घडामोडीदिल्लीच्या विकासाचा हा विजय आहे - केजरीवाल

दिल्लीच्या विकासाचा हा विजय आहे – केजरीवाल

Subscribe

दिल्ली नागरिकांनी देशातील राजकारणाला एक वेगळं वळणं दिलं आहे. फक्त दिल्ली नागरिकांचा हा विजय नसून भारत मातेचा विजय असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाला आहे. भाजप, आप आणि काँग्रेस असे तीन पक्ष निवडणुकीला सामोर जात असले, तरी केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातच खरी लढत पाहायला मिळाली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार आलं असून केजरीवाल यांनी हॅट्ट्रिक केली आहे. याच विजयाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल म्हणाले की, ‘दिल्ली नागरिकांनी आश्चर्यचा धक्का दिला. आय लव्ह यू दिल्लीकरांनो. तिसऱ्यांदा तुम्ही आपल्या मुलांवर विश्वास दाखवला. हा विजय दिल्लीकरांचा आहे. ज्यांनी मुलगा म्हणून मला मत दिले आहे हा त्यांचा विजय आहे. ज्यांना २४ तास घरात वीज मिळतं आहे हा त्यांचा विजय आहे. ज्यांना चांगलं शिक्षण मिळतं आहे हा त्यांचा विजय आहे. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये ज्यांना चांगले उपचार मिळाले आहेत हा त्यांचा विजय आहे.’

नवीन राजकारणाला जन्म दिला – केजरीवाल 

पुढे ते म्हणाले की, ‘दिल्ली नागरिकांनी देशातील राजकारणाला एक वेगळं वळणं दिलं आहे. तसंच नवीन राजकारणाला जन्म दिला आहे. मत ज्याला जो शाळा बांधेलं, मत ज्याला जो रहिवाशांसाठी मेडिकल बांधेलं, मत ज्याला जो २४ तास वीज पुरवठा करेल, मत ज्याला जो स्वस्तात वीज देईल, घराघरात पाणी देईल, रस्त बांधून देईल असा दिल्लीच्या नागरिकांनी संदेश दिला आहे. आजपासून नवीन राजकारणाला सुरुवात झाली असून ही देशासाठी खूपच शुभ गोष्ट आहे. हेच राजकारण आपल्या देशाला २१ व्या शतकात नेऊ शकते. फक्त दिल्लीतील नागरिकांचा विजय नसून हा भारत मातेचा विजय आहे.’

- Advertisement -

दिल्लीत हनुमानजींच्या कृपेचा वर्षाव – केजरीवाल

आज मंगळवार हनुमानजींचा दिवस आहे. दिल्लीत हनुमानजींच्या कृपेचा वर्षाव झाला आहे. हनुमानजींचे खूप खूप आभार. पुढील पाच वर्षासाठी अशाच प्रकार आम्हाला दिशा दाखवत राहा. मी दिल्लीतील नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे खूप आभारी आहे. पुढील पाच वर्ष आपण सगळे एकत्र मिळून मेहनत करू, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा – हे आहेत ‘आप’च्या विजयी घौडदौडीचे खरे शिल्पकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -