घरदेश-विदेशलवकरच प्लाझ्मा बँक तयार होणार, केजरीवाल यांची घोषणा!

लवकरच प्लाझ्मा बँक तयार होणार, केजरीवाल यांची घोषणा!

Subscribe

दिल्लीच्या शासकीय रुग्णालयात एक बँक स्थापन होणार

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या रूग्णाची संख्या आता वेगाने वाढत आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही दिल्लीत प्लाझ्मा बँक तयार करू, कोरोनाला हरवून जे रूग्ण बरे झाले ते आपला प्लाझ्मा देऊ शकतात. यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांना प्लाझ्मा मिळणे शक्य होणार आहे. दिल्लीच्या शासकीय रुग्णालयात एक बँक स्थापन केली जाईल, जर कोणाला प्लाझ्मा हवा असल्यास त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, एखादा रुग्ण स्वत: साठी सांगू शकत नाही, मात्र डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनने हा प्लाझ्मा मिळू शकतो. ही प्लाझ्मा बँक दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे. तसेत आम्ही लोकांना आवाहन करतो की, जे बरे झाले आहेत त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा द्यावा.

- Advertisement -

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत दिल्लीतील परिस्थितीबद्दल चर्चा केली. दरम्यान, अमित शाह म्हणाले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गेल्या जुलैपर्यंत ५ लाख कोरोना रुग्ण आढळल्याचे सांगितले. त्यामुळे, सध्या दिल्लीत भीतीचे वातावरण आहे. गृहमंत्री म्हणाले की, यामुळे दिल्ली केंद्रात केंद्र सरकारला सक्रीय व्हावे लागले. दरम्यान दिल्लीत होणाऱ्या कोरोनाची चाचणी चारपटीने वाढली आहे, तर सतत ट्रेसिंगचे काम केले जात आहे. दिल्लीत रुग्णालये, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह अनेक समस्यांचे निदान झाले असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

- Advertisement -

ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत आता कोरोना विषाणूची एकूण ८३ हजार ७७ जणांना कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे २७ हजार कोरोना रूग्ण अॅक्टिव्ह आहे, तर राजधानीमध्ये आतापर्यंत २ हजार ६२३ लोकांचा मृत्यू झाला आहे.


पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले; जाणून घ्या आजचे दर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -