Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश 15 मिनिंटात चहा पोहोचवल्याने झॉमॅटो बॉयला लागली लॉटरी, मिळाले 73 हजारांचे बक्षिस

15 मिनिंटात चहा पोहोचवल्याने झॉमॅटो बॉयला लागली लॉटरी, मिळाले 73 हजारांचे बक्षिस

अकिलचे वडील चप्पल बनवण्याचे काम करतात. कोरोनामुळे त्यांचे काम ठप्प झाले. यानंतर 21 वर्षिय अकिलवर घराची संपुर्ण जबाबदारी आली. अकिलने सांगितले तो दररोज 80 किलोमीटरचा प्रवास करुन20 ऑर्डर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

Related Story

- Advertisement -

आजच्या डिजीटल जगात प्रत्येकाचे आयुष्य घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावत आहे. कोणाकडे ही वेळ नाहीये. माणूस हा संपुर्णपणे टेकनिकल झाला आहे. त्याला प्रत्येक काम करण्यासाठी मशीनची गरज भासते. पण एका व्यक्तीने त्याच्या मेहनतीच्या बळावर स्वत: चे नाव कमावले आहे. त्याने भर पावसात फक्त चहा पोहचवण्याठी तो सायकल चालवत ग्राहकाकडे गेला पण दैव बलवत्तर म्हणुन याच दिवशी त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. काय आहे संपुर्ण घटना जाणुन घेऊया हैद्राबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने झॉमॅटो डिलीवरी बॉयला त्याच्या सुपरफास्ट कामगिरी बद्दल एक अनोखी भेट दिली आहे. हैद्राबादमधील कोटी क्षेत्रात राहणारा रॉबिन मुकेश हा इसम आयटी सेक्टरमध्ये काम करतो सध्या तो वर्क फॉम होम करतोय त्याने झॉमॅटोवरुन सकाळी 10 वाजता चहा मागवला होता आणि त्यावेळी धो-धो पावसाच्या सरी बरसत होत्या. मोहोम्मद अकील नावाच्या डिलीवरी बॉय हा मेहदीपटनम येथे उपस्थित होता.मला पुढच्या काही मिनिंटातच त्याचा फोन आला त्याने मला चहा घेण्यास खाली बोलावले. त्यावेळस अकील पुर्णत: भिजलेला होता आणि हैराण करणारी बाब म्हणजे तो सायकलवरुन चक्क 15 मिनिंटात एवढ्या दूरुन आला होता. मला त्याची कामगिरी चांगलीच भावली.

 

- Advertisement -

तो एवढ्या दूरुन कसा लवकर पोहोचला असा प्रश्न केला. त्यावर तो उत्तरला मी एकावर्षा पासुन सायकलवर फुड डिलीवरी करत आहे. त्याची मेहनत पाहून मी त्याला काहीतरी मदत करण्याचे ठरवले. आणि अकीलचा फोटो काढून रॉबिन मुकेशने एका फूड ॲन्ड ट्रॅवल फेसबुक पेजवर पोस्ट करुन त्याची संपुर्ण स्टोरी लिहली काही दिवसातच हि पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेत तब्बल 73 हजार रुपयांची मदत नीधी जमा झाला. जेव्हा अकीलला विचारण्यात आले की तुला या नीधीतुन काय हवंय त्याने मोटारसायकल मिळेल तर फार उपयोग होईल असे म्हंटले.

अकिलचे वडील चप्पल बनवण्याचे काम करतात. कोरोनामुळे त्यांचे काम ठप्प झाले. यानंतर 21 वर्षिय अकिलवर घराची संपुर्ण जबाबदारी आली. अकिलने सांगितले तो दररोज 80 किलोमीटरचा प्रवास करुन20 ऑर्डर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


- Advertisement -

हे हि वाचा  Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट असूनही एप्रिलमध्ये लाखो मिळाल्या नोकऱ्या

- Advertisement -