घरदेश-विदेशजगभरात डेल्टा व्हेरिएंटचा धुमाकूळ; १८५ देशांमध्ये आढळले रुग्ण - WHO ची माहिती

जगभरात डेल्टा व्हेरिएंटचा धुमाकूळ; १८५ देशांमध्ये आढळले रुग्ण – WHO ची माहिती

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गसुरू असून त्याच्या डेल्टा व्हेरिएंटचा धुमाकूळ संपूर्ण जगभरात दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यूएचओच्या मते, हा व्हेरिएंट आतापर्यंत १८५ देशांमध्ये पसरला असून त्याचा कहर तेथे सुरू आहे. ग्लोबल हेल्थ एजन्सीने मंगळवारी आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले की, १५ ऑक्टोबर ते १५ सप्टेंबर दरम्यान ९० टक्के रूग्ण ही डेल्टा व्हेरिएंटची असल्याचे आढळून आले. तर अल्फा, बीटा आणि गामाची एक टक्क्यापेक्षा कमी रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

डेल्टा खूप वेगाने पसरत आहे आणि ते इतर संक्रमणांची जागा घेत आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने असे सांगितले की, ५७ देशांमध्ये इटा ८१, इओटा कमीतकमी ४९ आणि कप्पाचे ५७ रूग्ण सापडले असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी डब्ल्यूएचओच्या सोशल मीडिया लाइव्ह दरम्यान सांगितले.
जगभरातील त्यांच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर, त्यांना व्हेरिएंट ऑफ इंटरेस्टमधून व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंगच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. तर डेल्टा व्हेरिएंट जगातील बहुतेक भागात वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमुळे टेक्सासच्या तुरुंगात लस घेणारे आणि लसीकरण न केलेले लोक दोन्ही संक्रमित झाले असल्याची माहिती यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने मंगळवारी दिली. या एजन्सीने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले की, तुरुंगात बंद असलेल्या २३३ कैद्यांपैकी १८५ म्हणजेच ७९ टक्के कैद्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान १७२ म्हणजेच ७४ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती.


ब्रिटनने भारतीय कोविशील्डला’ या’ कारणांसाठी मान्यता दिली नव्हती

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -