घरदेश-विदेशAmarnath Yatra 2021: आजपासून भाविकांना करता येणार यात्रेचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Amarnath Yatra 2021: आजपासून भाविकांना करता येणार यात्रेचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन

Subscribe

देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, अमरनाथ यात्रेकरता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाला यंदा या यात्रेसाठी साधारण ६ लाखांहून अधिक भाविक येण्याची आशा आहे. ५६ दिवसापर्यंत सुरू असणारी ही यात्रा यंदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेने सुरू होणार आहे. यावर्षीची अमरनाथ यात्रा २८ जून रोजी सुरू होणार असून २२ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी समाप्त होणार आहे. दरम्यान, आजपासून बाब बर्फानींच्या भाविकांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांना http://jksasb.nic.in या बोर्डाच्या वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे. अशी माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतिश्वर कुमार यांनी दिली. अमरनाथ यात्रेचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना भाविकांना त्यांच्या संपूर्ण माहितीसह हेल्थ सर्टिफिकेट देणं देखील आवश्यक असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या यात्रेला वयवर्ष १३ पेक्षा कमी आणि ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या भाविकांना हे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे सल्लागार बसीर अहमद खान यांनी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गांदरबल येथे भेट दिली. अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी गांदरबलच्या उपायुक्तांना दिल्या आहेत. उपराज्यपालांच्या सल्लागाराने वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा, नियंत्रण कक्षांची स्थापना, वैद्यकीय योजना तयार करणे, आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करणे, खाद्यपदार्थांचा पुरवठा करणे, सफाई यासह इतर सर्व व्यवस्था या यात्रेदरम्यान करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -