Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक युद्धात भारताने फडकावला विजयाचा झेंडा; पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा

पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक युद्धात भारताने फडकावला विजयाचा झेंडा; पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा

Subscribe

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमधील कारगिलला पोहचले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळीचं सेलिब्रेट केलं आहे.  मोदींना जवांना संबोधित करताना कारगिलमध्ये म्हटले की, वर्षानुवर्षे माझ्यासाठी तुम्ही सर्व माझे कुटुंबीय आहेत. माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यामध्ये वाढतो, माझ्या दीपावलीचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे जे पुढील दिवाळीपर्यंत माझे स्थान वाढवते. (diwali 2022 pm narendra modi reaches kargil will celebrate diwali with soldiers)

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, पाकिस्तानसोबतचे एकही युद्ध असे झाले नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकवला नाही. दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवणारा उत्सव. कारगिलनेही तेच केले. एखाद राष्ट्र अमर असते जेव्हा तिची मुलं, तिचे शूर पुत्र आणि मुलांचा त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असतो.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी याआधी अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी रामजन्मभूमी मंदिरात प्रार्थना केली. तसेच दीपोत्सव कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी ट्विट करून लिहिले की, प्रकाशाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तराखंडमध्ये पोहोचले होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी बद्रीनाथ आणि केदारनाथलाही भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी जनतेशी संवादही साधला. गेल्या वर्षी पीएम मोदींनी जम्मूच्या नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. भारतीय सीमेवर सेवा बजावल्याबद्दल त्यांनी सैनिकांचे कौतुक केले आणि सुरक्षा जवानांना देशाचे “संरक्षण कवच” असे वर्णन केले. सैनिकांमुळेच लोक शांतपणे झोपू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले होते.

2020 मध्ये, राजस्थानमधील जैसलमेर येथील लोंगेवाला येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, जोपर्यंत भारतीय सैनिक उपस्थित आहेत, तोपर्यंत या देशाची दिवाळी उत्साहात आणि रोषणाईने भरलेली असेल. तर 2019 मध्ये पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) राजौरी जिल्ह्यात सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांनी सैनिकांना आपले कुटुंब म्हणून संबोधले होते आणि सणासुदीच्या काळातही सीमांचे रक्षण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते.

2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हरसिल येथे भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर त्यांनी केदारनाथ धाममध्ये पूजा केली. 2017 मध्ये पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ खोऱ्यात लष्कराचे जवान आणि सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांसोबत प्रकाशाचा उत्सव साजरा केला.

2016 मध्ये पंतप्रधान हिमाचल प्रदेशात एका चौकीवर इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस कर्मचार्‍यांसोबत उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. तर 2015 मध्ये ते जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंजाब सीमेवर गेले होते. 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी सियाचीनमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून पंतप्रधान मोदी दिवाळीला सैनिकांना भेट देत आहेत.


भारत- पाक मॅचप्रमाणे 3 महिन्यापूर्वी आम्हीही मॅच जिंकली; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -