घरट्रेंडिंगVideo: आम्हाला करोना व्हायरस बोलू नका; ईशान्य भारतीयांचा भावनिक व्हिडिओ

Video: आम्हाला करोना व्हायरस बोलू नका; ईशान्य भारतीयांचा भावनिक व्हिडिओ

Subscribe

या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना पहिल्यांदा चीनकी, चीनी म्हणून चिडवतं होते. पण आता करोना व्हायरस पसरल्यानंतर या विद्यार्थ्यांना करोना व्हायरस म्हणून चिडवलं जात आहे.

करोना व्हायरसमुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. यादरम्यानच करोना व्हायरसमुळे ईशान्य भारतीय लोकांना वर्णद्वेष आणि भेदभावाला सामोर जावे लागत असल्याच प्रकरण समोर आलं आहे. याबाबतच अलीकडे पंजाबमधील चुन्नी कला नावाच्या छोट्याशा गावातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करोना व्हायरसच्या प्रसारानंतर लोक त्यांना करोना व्हायरस म्हणून चिडवतं आहेत. याविषयी बोलण्यासाठी विद्यार्थ्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ केला.

पहिल्यांदा या विद्यार्थ्यांना चीनकी, चीनी असं चिडवतं होते. मात्र, करोना व्हायरस पसरल्यामुळे या विद्यार्थ्यांना आता करोना व्हायरस म्हणून चिडवलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ दिमापूर २४/७ इन्स्टाग्राम या फेसुबक पेजने शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये विद्यार्थी म्हणाले की, कॉलेज मधून जाताना करोना व्हायरस म्हणून आम्हाला चिडवलं जात. आमच्या चीनी लूकमुळे हे होत आहे. काही कॉलेजमधून आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात आहे. अशाप्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.

- Advertisement -

Stop calling us corona, chinki, Chinese….North East students of Punjab.#Govt_Of_India#say #No #to #Racism#Students #Northeast#India

Dimapur 24/7 -Instagram ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 13, 2020

एकाबाजूला करोनाबाबत दहशत पसरत असली तरी दुसऱ्या बाजूला या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत जगभरात एकूण १ लाख ८३ हजार १९४ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार १६४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच ६ हजार ५०६ करोना रुग्ण हे गंभीर आहेत. तर ८० हजार १७ करोना रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Video: करोना बाधितांना उपचार देणारे डॉक्टर इतक्या वेळा धुतात हात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -