घरताज्या घडामोडीकडक उन्हामुळे गंगा नदीत वाढले वाळूचे ढिगारे, शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ

कडक उन्हामुळे गंगा नदीत वाढले वाळूचे ढिगारे, शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ

Subscribe

उन्हाची झळ यंदा वेळेआधीच वाढली आहे. गर्मीचा परिणाम माणसांसह आता सृष्टीवरसुद्धा होताना दिसत आहे. मार्च महिन्यातच मे आणि जूनसारख्या गर्मीने रेकॉर्ड तोडले आहेत. आता नद्यांवरसुद्धा गर्मीचे विपरित परिणाम दिसू लागले आहेत. नद्यांमधील पाणी आटत चालले आहे. वाराणसीमधील गंगा नदीचा व्हायरल फोटो चिंतेत वाढ करणारा आहे. नेहमी मे आणि जूनच्या महिन्यात गंगा नदीत वाळूचे ढिगारे दिसत होते परंतु आता मार्च महिन्याच्या शेवटीच गंगा नदीमधील वाळूचे थर दिसायला लागले आहेत. यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

वाराणसीमध्ये पारा ४१ डिग्रीवर पोहोचला आहे. यामुळे गंगा नदीतील पाणी आतापासूनच कमी होत चालले आहे. वाराणसीतील रामनगरच्या समोर असलेल्या गंगा घाटवर मध्यभागी जे वाळूचे थर मे-जून महिन्यातच पाणी कमी झाल्यामुळे दिसायचे ते आताच मार्च महिन्यात दिसू लागले आहेत. वेळेपूर्वीच गंगा नदीतील पाण्याची पातळी कमी होणे शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. शास्त्रज्ञ लोकांना सतर्क करत असून उपायसुद्धा सांगत आहेत.

- Advertisement -

बीएचयू मालवीय गंगा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आणि गंगा शास्त्रज्ञ प्रो. बीडी त्रिपाठी यांनी यांसंदर्भात सांगितले की, गंगा नदीतील प्रवाह कमी होत आहे. गंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर गाळ मोठ्या प्रमाणात साचतो. यामुळे हे वाळूचे ढिगारे दिसून येतात. पूर्वी हे ढिगारे मे-जूनमध्ये दिसत होते. यानंतर एप्रिल-मे मध्ये दिसत होते. परंतु यंदा वेळेपूर्वीच मार्च महिन्यात दिसून आले आहेत. गंगेतील प्रवाह मंदावल्यामुळे वाळूचे थर दिसत आहेत.

गंगा नदीतील प्रवाह कमी होण्याची चार कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे उत्तराखंडमध्ये जलविद्युत निर्मितीसाठी अनेक धरणे बांधली गेली आहेत. दुसरे कारण म्हणजे, हरिद्वारजवळील भीमगोडा कालव्याचे पाणी इतर राज्यांमध्ये वळवण्यात येत आहे. तिसरे कारण गंगेच्या दोन्ही बाजूचे उपसा कालवे गंगेचे पाणी खेचून शेतात सिंचनासाठी देत आहे. या कारणांमुळे गंगा नदीतील प्रवाहाचा वेग कमी झाला आहे. तसेच गंगेतून किती पाणी काढता येईल यासाठी कोणतेही धोरण नाही. यामुळे गंगेतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.

- Advertisement -

गंगा नदीच्या परिस्थितीवर प्रो. बीडी त्रिपाठी यांनी उपाय सांगताना म्हटलं आहे की, याचा दुष्परिणाम असा आहे की, ज्यामुळे गंगेतील प्रदुषण वाढत आहे. तर जलचर जिवांना धोक निर्माण होत आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण व्हावे आणि योग्य तंत्रज्ञान वापरावे हा त्याच्यामागे उपाय आहे.


हेही वाचा : MCD Amendment Bill 2022: महाराष्ट्रासाठी मी असं विधेयक आणू शकत नाही, अमित शहांच केंजरीवालांना उत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -