Lockdown: बिझनेस मॅनवर आली गाडीत राहण्याची वेळ!

during the lockdown maharashtra family travel from mumbai to patna
Lockdown: बिझनेस मॅनवर आली कारमध्ये राहण्याची वेळ!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील लॉकडाऊनला दोन महिने होतील. तरी देखील कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या मजुरांची अजूनही पायपीट सुरू आहे. मजूर घरी परतण्यासाठी सतत धडपडत करताना दिसत आहेत. या कोरोनाच्या संकटामुळे अनेक कुटुंबावर बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीत एक कुटुंब आपली कार घेऊन मुंबईहून बिहारला जायला निघाले. ते सोमवारी भोपाळमध्ये पोहोचले. पण या कुटुंबावर कारमध्येच राहण्याची पाळी आली आणि त्यांनी या कारला आपले घर बनवले. या कारमध्ये घरातल्या प्रत्येक वस्तू दिसत आहे.

मुंबईतील सीएसटी येथील एका कपडे विकणाऱ्या व्यावसायिकाचे हे कुटुंब आहे. या व्यावसायिकाचे नाव शांतनु कुमार असून तो आपल्या कुटुंबासोबत चार दिवसांपूर्वी मुंबईतून बिहार निघाला होता. त्याच्यासोबत पत्नी आणि दोन मुली प्रिया आणि रिया होती. कुमार कुटुंबाने सोमवारीची पूर्ण रात्र रस्त्याच्याकडेला घालवली. याबाबत शांतनु कुमारने सांगितले की, ते रात्रीचा प्रवास करत नाही. जेव्हा रात्र होत तेव्हा ते गाडी जिथे असेल तिथे थांबवतात आणि पूर्ण रात्र तिथेच राहतात.

पुढे तो म्हणाला की, लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. मुंबईमध्ये कोरोना जास्तच कहर आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याचे वांदे झाले होते. अशा परिस्थितीत आम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला.

या कुटुंबाने आपल्या कारला छोटेस घर बनवले. त्यांनी कारमध्ये अंथरुणापासून ते खाण्या-पिण्याच्या सामनापर्यंत सर्व काही ठेवले होते. तसेच त्यांनी सकाळी उठून एका शेतात आंघोळ केली. नंतर कारमधला स्टोव्ह बाहेर काढून त्यांच्यावर जेवण शिजवले. त्यानंतर ते पुढील प्रवासाला निघाले. या कुटुंबाला आतापर्यंतच्या प्रवासात फक्त दोन वेळेचे जेवण तयार करावे लागेल. कारण काही ठिकाणी जेवणाचे पाकिट वाटली जात होती. मध्यप्रदेशात प्रवेश केल्यानंतर अनेक लोकांनी त्यांनी मदत केल्याचे शांतनु यांनी सांगितले.


हेही वाचा – LockDown: वडिलांच्या या कल्पनेमुळे मुलीच्या चेहऱ्यावर आला आनंद!