घरताज्या घडामोडीप्रयागराजच्या घाटावर पुन्हा आढळला मृतदेहांचा खच, ५० हून अधिक पार्थिवांवर...

प्रयागराजच्या घाटावर पुन्हा आढळला मृतदेहांचा खच, ५० हून अधिक पार्थिवांवर अंत्यसंस्कार

Subscribe

महापालिकेचे झोनल अधिकारी आपल्या टीमसोबत रेतीतून बाहेर येणाऱ्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याचे काम करत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांचे मृत्यू झाले. उत्तर प्रदेशच्या गंगा घाट येथून अत्यंत भयानक परिस्थिती समोर आली होती. अंतिम संस्कार करण्यासाठी जागाच नसल्याने अनेक हिंदू धर्मीयांचे मृतदेह रेतीत गाढण्यात आले. मात्र आता ते गाढलेले मृतदेह बाहेर येऊ लागले आहेत. गंगा घाटात पूराच्या पाण्यामुळे रेतीत गाढण्यात आलेल्या मृतदेहावरील रेती पाण्यामुळे निसटून जाऊ लागली आहे त्यामुळे गंगा घाट तसेच प्रयागराज घाटावर गाढण्यात आलेले मृतदेह बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी जवळपास ५० हून अधिक मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. मृतदेह विचित्र पद्धतीने बाहेर येऊ लागल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूरामुळे नावेच्या सहाय्याने अंतिमसंस्कार करण्यासाठी लाकडे आणावी लागत आहेत. महापालिकेचे झोनल अधिकारी आपल्या टीमसोबत रेतीतून बाहेर येणाऱ्या मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याचे काम करत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फाफामऊच्या गंगा घाटात अनेक मृतदेह रेतीत गाढण्यात आले होते. मात्र त्यानंतर गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अंतिम संस्कार थांबवण्यात आले होते. मात्र काही दिवसातच रेती खाली गाढलेले मृतदेह बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. मृतदेह बाहेर येऊ लागल्याने परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. बाहेर आलेल्या मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्याचे काम सुरु आहे.

- Advertisement -

४ जून रोजी फाफामऊ घाटात अज्ञात मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्यास सुरुवात झाली. सर्व अज्ञात मृतदेहांवर विधीवत अंतिमसंस्कार करण्यात आले. १७ जून रोजी २४ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर २५ जून रोजी १०० जणांवर अंतिमसंस्कार करण्यात आले. २४ दिवसांमध्ये जवळपास १५० हून अधिक मृतदेहांचे अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ लागल्याने अंतिम संस्कार थांबण्यात आले. त्यानंतर काही दिवसातच मृतदेह बाहेर येण्यास सुरुवात झाली.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मदच्या टॉपच्या अतिरेक्याचा खात्मा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -