Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी फेसबुकवरील बातम्या पाहण्यास आणि शेअर करण्यावर आता बंदी

फेसबुकवरील बातम्या पाहण्यास आणि शेअर करण्यावर आता बंदी

फेसबुकवरील बातम्या पाहण्यास आणि शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियामधील फेसबुक हे असे माध्यम आहे, जे तात्काळ एखादी माहिती कोट्यावधी युजर्सपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण फेसबुकचा वापर करतात. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बातम्या शेअर करण्यासाठी फेसबुक हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे बरेच न्यूज पोर्टल हे फेसबुकच्या माध्यमातून आपली बातमी शेअर करत असतात. विशेष म्हणजे आतापर्यंत फेसबुकला एखादी बातमी शेअर करताना समोरच्या कंपनीला पैसे मोजावे लागत नव्हते. मात्र, आताच्या नव्या कायद्यानुसार बातमीचा मजकूर घेण्यासाठी फेसबुकला पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आता फेसबुकवर बातमी पाहण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी युजर्सला देखील पैसे मोजावे लागणार आहेत. फेसबुकच्या या निर्णयामुळे युजर्सने फेसबुकला चांगलेच फटकारले आहे.

कुठे आहे ही बंदी?

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया देशात आता फेसबुकवरील बातम्या पाहण्यास आणि शेअर करण्यास युजर्सवर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाहीतर आरोग्य, आपत्कालीन आणि इतर सरकारी सेवांचे पेजेसही ब्लॉक करण्यात आले आहेत. यासोबतच फेसबुकने ऑस्ट्रेलियात स्वत:चे पेजदेखील ब्लॉक केले आहे. यावरुन फेसबुकला चांगलेच फैलावर घेतले असून सध्या फेसबुकला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

काय आहे हा कायदा?

नव्या कायद्यानुसार गुगल आणि फेसबुकला मजकूरासाठी स्थानिक न्यूज पब्लिशर्सना पैसे द्यावे लागतील, असा निर्णय पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आला. या निर्णयावर चर्चा सुरु असल्याची माहिती खजिनदार जॉश फ्रायडनबर्ग यांनी दिली. मात्र, चर्चा सुरु असतानाच फेसबुकने कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, फेसबुककडून करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. कारण अशा कारवाईची कोणतीही आवश्यकता नाही, अशी टीका जॉश फ्रायडनबर्ग यांनी केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Farmer Protest : दिल्लीत शेतकरी आंदोलकांचा आज ‘रेल रोको’चा पवित्रा


 

- Advertisement -