घरCORONA UPDATELockdown: फॉरेन ट्रीप रद्द झाल्यामुळे या कुटुंबाने केलं काहीतरी भन्नाट अकल्पित! वाचाल...

Lockdown: फॉरेन ट्रीप रद्द झाल्यामुळे या कुटुंबाने केलं काहीतरी भन्नाट अकल्पित! वाचाल तर तुम्हालाही करावंसं वाटेल!

Subscribe

घरात बसून बोअर झालंय..वैताग आलाय…काय करावं काही सुचत नाहीये… हे असे संवाद तुमच्या घरात जर वारंवार सुरू असतील, तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. कोरोनामुळे घरातच लॉकडाऊन झाल्यानंतर घरातच काहीतरी करण्यासाठी शोधून काढण्याचा उद्योग सध्या सगळेजण करत आहेत. पण काहींना ते सापडलं, तर काही नुसतेच बसून बसून आळसावतायत. पण ऑस्ट्रेलियातल्या एका कुटुंबानं अशी काही भन्नाट कल्पना शोधून काढली की जिची कल्पनाच कुणी केली नसेल! आणि जर तुमच्याही कुटुंबाला या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये घरात बसून राहण्याचा उबग आला असेल, तर एकदा हा प्रकार ट्राय करायला हरकत नाही! अर्थात, त्यासाठी तुमच्या कल्पकतेची कसोटी लागेल हे निश्चित!

- Advertisement -

कोरोनाचा लॉकडाऊन जाहीर होण्याआधी अनेकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी प्लॅन केले होते. मात्र, आता ते सगळे त्यांना पुढे ढकलावे लागले आहेत. पण यातही ऑस्ट्रेलियातल्या या कुटुंबाने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. कर्सटी रसेल आणि तिचा पती नॅथन यांनी युरोप ट्रीपचा प्लॅन केला होता एप्रिल महिना त्यांचा युरोपातच जाणार होता. १५ एप्रिलची सिडनीहून मेलबर्नला जाणाऱ्या फ्लाईटची तिकिटं देखील त्यांनी काढली होती. पण लॉकडाऊनमुळे त्यांचा प्लॅन फसला. मग त्या दोघांनी त्यांच्या तीन मुलांसोबत फ्लाईटचा १५ तासांचा प्रवास आणि युरोपची आख्खी टूर घरातच रिक्रिएट करायचं ठरवलं!

- Advertisement -

मग काय, त्यांनी आधी हॉलची रचना एखाद्या विमानाच्या आतल्या भागासारखी केली. जिथे खुर्च्या, किचन, एअर होस्टेस असं सगळं त्याच पद्धतीने असेल. एवढंच काय, विमानात एकच वॉशरुम असतं, म्हणून त्यांनी घरात दोन वॉशरूम असून देखील एकाचाच वापर सुरू ठेवला. रसेल यांचा १६ वर्षांचा मुलगा झाला विमानतळावरचा सेक्युरीटी चेक अधिकारी. त्यांचा पती नॅथन झाला विमानात जेवण सर्व्ह करणारा फ्लाईट अटेंडी आणि त्यांची १४ वर्षांची मुलगी झाली चेक इन काऊंटरवरची एअर होस्टेस! सेक्युरीटी झाल्यावर त्यांना चक्क घरातच तयार केलेले बोर्डिंग पास देखील काऊंटरवर मिळाले! सारंकाही विमानातल्या प्रवासाप्रमाणे. कर्सटी रसेल, त्यांचे पती आणि त्यांची सर्वात लहान ९ वर्षांची मुलगी असे सगळे त्या आभासी विमानात बसले. आणि चक्क १५ तासांचा सिडनी ते म्युनिच प्रवास त्यांनी त्यांच्या हॉलमध्ये उभारण्यात आलेल्या ‘विमाना’त केला! सोमवारी दुपारी ते विमानात बसले आणि रीतसर मंगळवारी सकाळी म्युनिचमध्ये लॅण्ड देखील झाले!

या १५ तासांमध्ये त्यांना नॅथनने विमानात मिळतात त्याच पद्धतीने मात्र घरात बनवलेले पदार्थ सर्व्ह केले. त्यांनी विमानाप्रमाणेच घरातलं एकच वॉशरूम वापरलं. आणि विमानाप्रमाणेच टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम, वेबसीरीज आणि चित्रपट पाहिले! आता पुढे देखील त्यांना युरोपमध्ये ज्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या असत्या, त्या ठिकाणची दृश्य रीक्रिएट करून सेलिब्रेट करायचं आहे. पण आता त्यांच्यासमोर पेच असा आहे की त्यांच्या सर्वात लहान मुलीने डिझने वर्ल्डमध्ये जाऊन तिथला फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकायचं ठरवलं होतं. आता घराच्या हॉलमध्ये डिझने वर्ल्ड कसं उभं करायचं, याचा विचार सध्या हे कुटुंब करतंय!

कर्सटी रसेल म्हणतात की त्या हनिमूनसाठी युरोपमध्ये आल्या होत्या. आता त्यांना त्यांच्या मुलांना देखील युरोप दाखवायचा होता. पण लॉकडाऊनमुळे ते होऊ शकलं नाही. ‘मग आम्ही म्हटलं की ट्रीपवर जाता आलं नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा लॉकडाऊन स्टाईलमध्येच ही ट्रीप का नाही करायची? या सगळ्यामुळे आमचं कुटुंब जास्तच जवळ आलं आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर आम्ही असे सगळेजण एकत्र आलोय आणि तेही इतका वेळ! या प्रकारामुळे आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी स्पेशल झाल्या. आम्हाला वाटलं आमचा हा वेडेपणा मुलांना आवडणार नाही. पण मुलं तर हे सगळं आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय करत आहेत!’

तर कर्सटी, त्यांचे पती नॅथन आणि त्यांची तीन मुलं त्यांची युरोप ट्रीप त्यांच्या घरातल्या एका खोलीतच पूर्ण करणार आहेत. ते प्रत्यक्षात जिथे जिथे गेले असते, त्या त्या ठिकाणची दृश्य आपल्या घराच्या हॉलमध्येच रिक्रिएट करणार आहेत. आणि यातून त्यांचं कुटुंबं अधिकच जवळ येणार आहे. एकमेकांसोबत घट्ट होणार आहे. तुमचं प्लॅनिंग काय होतं? काय घडतंय तुमच्या फॅमिलीमध्ये? चला तर मग, लागा कामाला!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -