घरदेश-विदेशओवेसी भाजपाचा 'चाचाजान'; राकेश टिकैतांनी लगावला टोला

ओवेसी भाजपाचा ‘चाचाजान’; राकेश टिकैतांनी लगावला टोला

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोरदार सुरुवात झाली आहे. या निवडणुकांच्या रंगणात आता ‘अब्बा जान’ नंतर आता ‘चाचाजान’च्या एंट्रीच्या चर्चा सुरु झाल्यात.  बागपतमध्ये दाखल झालेल्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन भाजपाचे चाचाजान असल्याचे उल्लेख केलाय. ओवेसी यांचा ‘चाचाजान’ असा उल्लेख करत त्यांनी भाजपावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. राकेश टिकैत यांनी ‘भाजपाचे ‘चाचाजान’ ओवेसी आता उत्तर प्रदेशात दाखल झालेत. तेच आता भाजपाला विजयाकडे घेऊन जातील. आता काहीच अडचण नाही.’ असा टोला लगावला आहे.

- Advertisement -

ओवैसीं उत्तर प्रदेशात दाखल होताच टिकैत यांनी ओवेसी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर बोलताना टिकैत म्हणाले की, भाजपाचे चाचाजान असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशात दाखल झालेत. यावेळी ओवेसींनी भाजपावर अत्यंत कठोर शब्दांत जरी टीका केली तरीही ओवेसींवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कारण, ते दोघेही एकच टीम आहेत”अशा जहरी टीका टिकैत यांनी केली आहे. राकेश टिकैत मंगळवारी बागपतच्या टटीरी गावातील शेतकऱ्यांच्या भेटीस आले होते. यावेळी टिकैत यांनी ओवेसीआणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान राकेश टिकैत यांनी विजेचे दर आणि एमएसपीसंदर्भात निवेदन दिले. यावेळी टिकैत म्हणाले की, देशातील सर्वात महाग वीज यूपीमध्येच आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य हमीभाव मिळत नाही. उसासाठी किमान आधारभूत किंमत ही ६५० रुपये प्रति क्विंटल असायला हवी. अशी मागणी केली.

- Advertisement -

यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी एमएसपीमध्ये मोठा घोटाळा झाल्य़ाचे दावा केला आहे. राकेश टिकैत म्हणाले की, ‘केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीची हमी द्यावी यासाठी आम्ही दिल्लीत आंदोलनाला बसलोय. त्यात आता हे देखील समोर येत आहे की, MSP मध्ये मोठा घोटाळा होत आहे. सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने धान्य आणि गव्हाच्या शासकीय खरेदीमध्ये प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा फरक आहे. रामपूरमध्ये ११ हजार बनावट शेतकऱ्यांनी हे धान्य खरेदी करून पुढे ते काही व्यापाऱ्यांना विकले आहे.’ असा आरोप टिकैत यांनी केला आहे.


Terrorist : दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिंग, तपासादरम्यान महत्त्वाची माहिती उघड

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -