घरअर्थजगतBank Locker Rules : बँक लॉकरच्या नियमात बदल, आता चोरी झाल्यास मिळणार...

Bank Locker Rules : बँक लॉकरच्या नियमात बदल, आता चोरी झाल्यास मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या नियम

Subscribe

जर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत लॉकरची सुविधा घेतली असेल, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ज्यानुसार आता ग्राहकांना अधिक फायदे मिळतील, तर बँकांची जबाबदारीही अधिक वाढणार आहे. हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि कधीपासून लागू होणार ते जाणून घेऊ…

रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे की, नवीन बँक लॉकर नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेत लॉकर घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवरून आरबीआयने हे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीचा थेट लाभ बँक ग्राहकांना मिळणार आहे.

- Advertisement -

अनेकदा बँक लॉकरमध्ये चोरीच्या तक्रारी येत होत्या. पण आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास, ग्राहकाला संबंधित बँकेकडून लॉकर भाड्याच्या 100 पट भरपाई दिली जाईल. आतापर्यंत बँका चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष करून त्याला जबाबदार नसल्याचे सांगत होत्या.

आरबीआयने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, बँकांना रिकाम्या लॉकर्सची यादी, लॉकरसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक डिस्प्लेवर ठेवावा लागेल. यामुळे लॉकर सिस्टिममध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. बँका ग्राहकांना अंधारात ठेवू शकत नाहीत, असे आरबीआयचे मत आहे. त्यांना योग्य माहिती मिळवण्याचा अधिकार आहे.

- Advertisement -

आता जेव्हाही तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये प्रवेश कराल, तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट दिला जाईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हा नियम आरबीआयने बनवला आहे.

नवीन नियमांनुसार, बँकांना लॉकर जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी भाड्याने देण्याचा अधिकार आहे. जर तुमच्या लॉकरचे भाडे 2000 रुपये असेल तर बँक तुमच्याकडून इतर देखभाल शुल्क वगळता 6000 रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाही.


Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा पोलीस कोठडी, कोल्हापूर जिल्हा कोर्टाचा निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -