मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल, निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

सामाजिक कार्यकरत्या आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Medha Patkar
ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर

सामाजिक कार्यकरत्या आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटकर यांनी त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षण देण्याबरोबरच इतर सामाजिक कार्याच्या नावाखाली १३.५ कोटी रुपये जमा केले. पण त्यांनी तो निधी राजकीय घडामोडी आणि विकास योजनांना विरोध दर्शवण्यासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे,

याप्रकरणी पोलीस अधिक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी माहिती देताना सांगितले की मेधा पाटकर यांच्यासह त्यांच्या संबंधित असलेल्या ११ जणांवर २००७ ते २०२२ या कालावधीदरम्यान नर्मदा नवनिर्माण संस्थेच्या नावावर गोळा करण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या चौदा वर्षात या संस्थेने आदिवासींच्या विकासासाठी, शिक्षणासाठी १३ कोटी ५२ लाख ५९ हजार ३०४ रुपयांचा रुपयांचा निधी गोळा केला आणि तेवढाच खर्चही केला. पण हा निधी कुठून आला कोणी दिला याबद्दल मात्र त्यांच्याकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

तसेच २०२० ते २०२२ या दोन वर्षांत जेव्हा जगभरात कोरोनाने थैमान घातले होते.  लॉकडाऊन आणि कोरोनामुळे कंपन्या डबघाईस आल्या होत्या तसेच सरकारही आर्थिक संकटता सापडले होते  त्यावेळी पाटकर यांच्या संस्थेला संरक्षण मंत्रालयातर्गंत येणाऱ्या माझगाव डॉक लिमिटेडने ६५ लाखाचा निधी दिल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीने आणि आयटीने पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून त्या सरकारी यंत्रणांच्या रडारवर होत्या.