घरदेश-विदेशदिवाळीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा; गोरखपूरमध्ये आढळले ४ संशयित

दिवाळीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा; गोरखपूरमध्ये आढळले ४ संशयित

Subscribe

दिल्ली आणि उत्तर प्रदेशासह इतर अन्य राज्यांमध्ये देखील सुरक्षा दलांच्या सुरक्षेत केली वाढ

राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण अर्थात ANI ने दिवाळीच्या दिवशी दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये चार संशयित दहशतवादी आढळून आल्याचे समोर आले आहे. नेपाळच्या सीमा भागावर एसएसबी आणि उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आढळलेले हे चार संशयित दहशतवादी नेपाळच्या मार्गाने भारतात घुसले असून १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये एकत्रित जमाणार असून हे सर्व संशयित दहशतवादी स्विफ्ट डिझायर या गाडीतून काश्मीर वरून दिल्लीमध्ये पोहणार असल्याचे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान दिल्ली आणि उत्तर प्रदेशासह इतर अन्य राज्यांमध्ये देखील सुरक्षा दलांनी आपली सुरक्षा वाढवली आहे. हे संशयित दहशतवादी सुरक्षा यंत्रणांसोबत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर एजन्सींनी त्यांची शोध मोहीम सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -