घरCORONA UPDATECovid Vaccine : देशातील पहिल्या Intranasal Vaccine च्या फेज-2 ट्रायलला मंजुरी, आता...

Covid Vaccine : देशातील पहिल्या Intranasal Vaccine च्या फेज-2 ट्रायलला मंजुरी, आता मानवावर होणार चाचणी

Subscribe

या लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, प्रयोगशाळेच्या अभ्यासात ही लस सुरक्षित, रोगप्रतिकारक आणि सहन करण्यायोग्य असल्याचे आढळून आले.

भारतातील पहिल्या Intranasal Vaccine म्हणजेच नाकावाडे देण्यात येणाऱ्या कोविड-19 या लसीच्या फेज-2 ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. आता या लसीची मानवावर चाचणी केली जाणार आहे. ही लस भारत बायोटेकने सेंट लुईसच्या वॉशिंग्टन विद्यापीठीच्या सहकार्याने तयार केली आहे. पहिल्या टप्प्यातही या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले.

BBV154 लस अनेक प्रकरणांमध्ये महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, इंट्रानोजल रिप्लिकेशन-डेफिसिएंट चिंपांझी एडेनोव्हायरस SARS-CoV2 व्हेक्टर लस ही भारतातील नियामक मान्यता मिळवणारी पहिली लस ठरली आहे, आता मानवावर या लसीची चाचणी केली जाणार आहे. ही लस किती प्रभावी आहे याविषयी, SARS-CoV-2 लसीच्या हिट्रोलोगस प्राइम बूस्टच्या संयोजनाच्या बहु-केंद्रित क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

या लसीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, प्रयोगशाळेच्या अभ्यासात ही लस सुरक्षित, रोगप्रतिकारक आणि सहन करण्यायोग्य असल्याचे आढळून आले. प्राण्यांवर झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ही लस उच्च पातळीचे न्यूट्रिलाईजिंग अँटीबॉडीज तयार करण्यास सक्षम आहे. फेज-1 चाचणीमध्ये काही स्वयंसेवकांनी त्यांना दिलेला डोस चांगलाच सहन केला.

मंत्रालयाने सांगितले की जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या सहकार्याने इंट्रानासल लस विकसित करण्यात आली आहे. DBT सचिव आणि BIRAC प्रमुख डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले की, भारत बायोटेकची BBV154 ही भारतात विकसित होणारी पहिली इंट्रानासल लस आहे जी तिच्या क्लिनिकल चाचण्यांच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या स्थितीत आहे.


Corona Update In India : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -