घरताज्या घडामोडीGoogle CEO:गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Google CEO:गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिचाई यांच्यावर कॉपी राईटच्या कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी पिचाई यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार केली होती.

नेमके प्रकरण आहे तरी काय?
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एक हसीना थी एक दिवाना था या चित्रपटाची निर्माते आहेत. असे असताना काही जणांनी गुगल आणि युट्यूबर या चित्रपटातील गाणी, व्हिडीओ अपलोड केले आहेत. असे करण्याआधी संबंधित निर्मात्याची परवानगी घेणे त्याचे राईट्स विकत घेणे कायदेशीररित्या गरजेचे असते. पण तसे न करता अनेकांनी या गाण्यांवर कोट्यवधी रुपये कमावले. त्यामुळे निर्माते सुनील दर्शन यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर दर्शन यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुगलचे सीईओ पिचाई आणि यूट्यूबचे एमडी गौतम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -