घरदेश-विदेश'हर घर तिरंगा' मोहिमेची पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिमाखात सुरुवात; अमित शहांनी सुद्धा...

‘हर घर तिरंगा’ मोहिमेची पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिमाखात सुरुवात; अमित शहांनी सुद्धा फडकावला तिरंगा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने लहान मुलांसोबत 'हर घर तिरंगा' या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. अमृत महोत्सवाचा आनंद देशात सर्वत्रच पहायला मिळतो आहे.

देशात सर्वत्रच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आजपासून म्हणजेच 13 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत संपूर्ण देशाने सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. केंद्र सरकारने सुद्धा देशभरात विवविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घराघरात तिरंगा फडकावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होते. याच क्रमाने आजपासून घरोघरी तिरंगा मोहीम सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या निवासस्थानी लहान मुलांना तिरंगा वाटून मोहिमेची सुरुवात केली त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांच्या पत्नी सोनल शाह यांच्यासह शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने लहान मुलांसोबत ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. अमृत महोत्सवाचा आनंद देशात सर्वत्रच पहायला मिळतो आहे. आज पासून सुरु झालेल्या ‘हर घर तिरंगा’ या मोहीमध्ये देशातील विविध भागातील मंडळींनी सहभाग घेतला आहे.

- Advertisement -

1) ‘हर घर तिरंगा मोहिमेची अनोख्या पद्धतीने सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला ‘तिरंगा’ भेट म्हणून दिला.

 

- Advertisement -

2) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांनी आज ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सुरुवात करताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला.

3) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथील त्यांच्या मुख्यमंत्री म्हणजेच शासकीय निवासस्थानी शाळकरी मुलांसोबत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सुरुवात केली.

 

4) हर घर तिरंगा मोहिमेच्या निमित्ताने ITBP च्या जवानांनी लडाखमध्ये 18,400 फूट उंचीवर तिरंगा फडकवला.

5) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ‘हर घर तिरंगा अभियाना’अंतर्गत सुरेंद्रनगरमध्ये आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीला हिलवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

6) मुंबईत सुद्धा दिव्यांग मुलींनी तिरंग्याच्या रंगात भाकरी आणि केक बनवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घेतला.

6) एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी हर घर येथे तिरंग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी मुंबईत सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.

 7) गुवाहाटीमध्ये तिरंगा प्रभातफेरी काढण्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा तिरंगा प्रभात फेरीत सहभागी झाले होते. हर घर येथे तिरंगा मोहिमेअंतर्गत ही प्रभातफेरी काढण्यात आली.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -