घरदेश-विदेशहार्वर्डच्या विद्यार्थ्यांनी दिला CAA निदर्शकांना पाठिंबा; भारत सरकारला लिहिले पत्र

हार्वर्डच्या विद्यार्थ्यांनी दिला CAA निदर्शकांना पाठिंबा; भारत सरकारला लिहिले पत्र

Subscribe

हार्वर्डच्या काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात असलेल्या निदर्शकांना पाठिंबा दिला. भारत सरकाराला एक पत्र लिहीत त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर ईशान्य भारतातून त्याला पहिल्यांदा निषेध करण्यात आला. त्यानंतर दिल्ली, लखनऊ, मुंबई या शहरात देखील आंदोलनाला सुरुवात झाली. तर दिल्लीत झालेल्या आंदोलनांनी एक हिंसक वळण घेतले होते. या कारणी नागरीकत्व कायद्याचा विषय हा फार गंभीर झाला आणि त्याची चर्चा ही सर्वत्र वाढली. या आंदोलनात जास्ती जास्त समावेश हा देशभरातील विद्यार्थ्यांचा आहे आणि हा विषय एकंदरीतच फार वादग्रस्त झाला आहे. तर ही घटना हार्वर्ड विद्यापीठापर्यांत देखील पोहोचली आहे. हार्वर्ड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी भारत सरकाराला पत्र लिहून या आंदोलनांना आपला पाठिंबा दिला आहे आणि नागरीकत्व कायद्याविरोधात आपला निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -
हार्वर्डच्या १२० विद्यार्थी आणि काही कार्यकरतांनी दिलेले पत्र
हार्वर्डच्या १२० विद्यार्थी आणि काही कार्यकरतांनी दिलेले पत्र

काय आहे या पत्रामध्ये?

अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ हे जगातील सगळ्यात सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून जाणले जाते. तर हार्वर्ड विद्यापीठाच्या पत्रात कायद्याविरोधात असलेल्या आंदोलनांना त्यांचा पाठिंबा आहे असे पत्राच्या पहिल्याच ओळी दिले गेले आहे.
जामिया आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठांच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराला त्यांचा निषेध आहे असं त्यांनी सांगितले आहे. हे पत्र हार्वर्डच्या १२० विद्यार्थी आणि काही कार्यकरतांनी दिलेले आहे. पत्रात पुढे हे देखील लिहीले आहे की निषेध करणे, आंदोलन करणे जरी गैरसोयीचे असले तरी लोकशाहीसाठी ते महत्तवाचे ठरते. देशातील धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी बनावट टिकवून ठेवण्यासाठी हे मतभेद महत्त्वाचे आहे.

‘प्रसारमाध्यमांवर महिला निदर्शकांनचे पोलिसांच्या क्रूरते बद्दलचे किस्से ऐकूण आम्ही फार विचलित आहोत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की या कार्यक्रमांमुळे योग्य प्रक्रिया, सार्वजनिक सहकार्य आणि असहमती यांच्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे’

– पत्रात लिहील्याप्रमाणे

हार्वर्डच्या ज्या विद्यार्थ्यांनी आणि कार्यकरतांनी हे पत्र लिहीले आहे ते, या कायद्याविरोधात असलेल्या भारताच्या विद्यार्थ्यांना आणि नागरीकांना पूर्णपणे पाठिंबा देत आहेत.


हेही वाचा: मोदीजी, ‘भाजपाच्या आयटी सेलला अफवा न पसरवण्याचे आवाहन करा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -