घरदेश-विदेश'हर घर तिरंगा' अभियानामुळे देशभक्तीची भावना अधिक दृढ, सरसंघचालक होसबळे यांचे प्रतिपादन

‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे देशभक्तीची भावना अधिक दृढ, सरसंघचालक होसबळे यांचे प्रतिपादन

Subscribe

चेन्नई : ‘हर घर तिरंगा’ अभियानाने संपूर्ण देशात देशभक्तीची भावना आणखी दृढ केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिसाहात आतापर्यंत असा उत्साह कधी पाहिलाही नाही आणि ऐकलाही नाही. या देशव्यापी महोत्सवात सहभागी झालेले सर्वजण खूश आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त चेन्नईच्या पूर्व तंबारम येथे सोमवारी एक कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे होसबळे बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांची, विशेषत: आदिवासी आणि दुर्गम भागातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहन राष्ट्रपीत द्रौपती मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केले होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणाची देखील त्यांनी प्रशंसा केली. आपण या महान देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. या देशाने आक्रमण करणाऱ्यांविरुद्ध एक हजार वर्षं संघर्ष केला. जगातील कानाकोपऱ्यातून हे आक्रमक आले होते. त्यातील काहींनी आपल्या देशावर काही वर्षे तर प्रदीर्घ काळ राज्य केले, असे होसबळे म्हणाले.

आपला स्वातंत्र्यसंग्राम आणि संघर्ष देशाच्या एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता. विविध क्षेत्रांतील तसेच व्यावसायांतील लोक या संग्रामात उतरले होते. आज आपल्याला त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे आदरपर्वक स्मरण करणे आवश्यक आहे, असे होसबळे म्हणाले.

- Advertisement -

पाच कोटींहून अधिक सेल्फी
देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खूप उत्साहाने साजरा करण्यात आला. केंद्र सरकारकडूनही विविध उपक्रम देशभरात राबविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत देशवासीयांना घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. त्याला देशवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. यासाठी एक वेबसाइट सुद्धा तयार करण्यात आली होती. त्या वेबसाइटवर पाच कोटींहून अधिक तिरंग्याचे सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सोमवारी जनतेने उदंड प्रतिसाद दिला असं भारताच्या सांस्कृतिक मंत्रायलयाकडून सांगण्यात आले आहे.

सेशवासियांच्या मनात देशप्रेमाची आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रध्वजाप्रति अधिक जागरूकता वाढविण्याच्या हेतूने ‘हर घर तिरंगा’ ही मोहिम संपूर्ण देशभरात राबविण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान राष्ट्र उभारणीची वचनबद्धता म्हणून सर्वत्र भारतीयांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आव्हान करण्यात आले होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -