घरदेश-विदेशतुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही; गडकरींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही; गडकरींचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

Subscribe

'आमच्या सरकारचे आणि मोदीजी यांचे हे यश आहे की, तुम्हाला आमच्यावर हल्ले करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत', असा टोला गडकरी यांनी राहुल गांधींना हाणला आहे.

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. राजकीय वर्तुळात जवळपास युद्धाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरुन नितीन गडकरी यांच्यावर खोचक टीका केली होती. मात्र, आता गडकरी यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही तुम्हाला पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी दुसऱ्यांचे खांदे शोधावे लागत आहेत. माध्यमांनी ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा तुम्हाला आधार घ्यावा लागत आहे’, असा टोला गडकरी यांनी लगावला आहे. गडकरी यांनी ट्वीटरद्वारे ही टोलेबाजी केली आहे.

गडकरी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये राहुल गांधींना टॅग करत लिहीले आहे की, ‘माझ्या हिंमतीसाठी तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. मला आश्चर्य याचे वाटते की एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतानाही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला माध्यमाकडून ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घ्यावा लागत आहे. आमच्या सरकारचे आणि मोदीजी यांचे हे यश आहे की, तुम्हाला आमच्यावर हल्ले करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत.’

- Advertisement -

गांधी – गडकरी ट्वीटर वॉर

काही दिवसांपूर्वीच ‘गडकरीजी तुमचे कौतुक! भाजपामध्ये थोडीफार हिम्मत असलेले तुम्ही एकमेव नेते आहात’, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली होती. ‘राफेल घोटाळा, अनिल अंबानी, शेतकऱ्यांमधली अस्वस्थतता, संस्थांचे नुकसान यावरदेखील तुम्ही काहीतरी बोला’ असा उपरोधिक सल्लाही त्यांनी गडकरी यांना दिला होता. राहुल यांच्या याच वक्तव्यांना आता गडकरी यांनी ट्वीटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. गडकरी म्हणतात की, ‘तुमच्या मुद्द्यांवर भाष्य करायचे झाल्यास  राफेलमध्ये आमच्या सरकारने देश हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक व्यवहार केला आहे. तुमच्या धोरणांमुळे शेतकऱ्याची जी अवस्था झाली आहे, त्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. त्यामध्ये आम्हाला यशही मिळत आहे. तुमच्यासह अनेकांना मोदी हे पंतप्रधान नको आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला असहिष्णुता आणि संवैधानिक संस्थांवर हल्ल्यांची स्वप्ने पडत आहेत.’

- Advertisement -

गडकरी यांच्या या टीकेमुळे दोन बड्या राजकीय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा ‘ट्वीटर वॉर’ रंगल्याचे चित्र दिसत आहे. आता राहुल गांधी यावर काय प्रतिक्रीया देतात? हे पाहणं औत्सुक्यांचं ठरणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -