घरदेश-विदेश'त्या' नेत्याच्या राजीनाम्यामुळं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत होणार वाढ

‘त्या’ नेत्याच्या राजीनाम्यामुळं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत होणार वाढ

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक आणि एमएमए शाहझैन बुगती यांनी सरकारचा राजीनामा देऊन विरोधकांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर पाकिस्तानातचे प्रधानमंत्री इमरान खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक आणि एमएमए शाहझैन बुगती यांनी सरकारचा राजीनामा देऊन विरोधकांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर पाकिस्तानातचे प्रधानमंत्री इमरान खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिलावल भुट्टो आणि शाहझैन बुगती या दोघांनी एकत्र पत्रकार परिषदे घेत याबाबत घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बुगती यांनी इम्रान सरकारचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. ”बलुचिस्तानमधील जनतेचा विश्वास खूप दुखावला गेला आहे. देशाची स्थिती पाहून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता बिलावल आणि विरोधकांसोबत उभे आहोत”, असं शाहझैन बुगती यांनी म्हटलं.

- Advertisement -

जम्हूरी वतन पार्टीचे प्रमुख आणि एमएनए शाहझैन बुगती यांनी रविवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो यांची भेट घेतली. या भेटीनंतर शाहझैन बुगती यांनी फेडरल कॅबिनेटमधून राजीनामा देण्याचा आणि सरकारमधून बाहेर येण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर ”शाहझैन बुगती यांनी सरकारचा राजीनामा देण्याचे पाऊल धाडसी आहे”, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं.

बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जमहूरी वतन पार्टी (JWP) प्रमुख आणि MNA शाहझैन बुगती यांच्यासह इतर विरोधी नेत्यांची भेट घेतली आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा मागितला. बिलावल भुट्टो आणि शाहझैन बुगती यांनी देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. या बैठकीला दोन्ही पक्षांचे सदस्यही उपस्थित होते.

- Advertisement -

JWP चे MNA शाहझैन बुगती हे इम्रान खान यांच्या आघाडी सरकारचा भाग होते. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना जेडब्ल्यूपी नेत्यानं सांगितले की, ”सध्याच्या सरकारने बलुचिस्तानच्या जनतेचा विश्वास दुखावला आहे, त्यामुळं त्यांनी फेडरल कॅबिनेटचा राजीनामा दिला आहे. मी आतापासून पीडीएमच्या पाठीशी उभा राहणार आहे”. याशिवाय, ”सरकारने बहुमत गमावले आहे आणि त्यांच्याकडे जाण्याशिवाय कोणताही मार्ग नाही. इतर विरोधी पक्षांशीही आमची चर्चा सुरू आहे”, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं.

दरम्यान, नॅशनल असेंब्लीच्या सचिवालयात विरोधी पक्षांनी ८ मार्च रोजी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. तसंच, देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.


हेही वाचा – ‘मी खासदार होण्यात अब्दुल सत्तारांचा मोलाचा वाटा’; एमआयएम खासदार इम्तियाज जलीलांचा गौप्यस्फोट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -