Live Update: इस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, भारतात अलर्ट जारी

live update
लाईव्ह अपडेट

इस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९चा नवा व्हेरिेएंट आढळून आला असून भारतात सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे


परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. १५ हजाराच्या जातमुचलक्यावर हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे


परमबीर सिंह ठाणे न्यायालयात दाखल झाले आहे. मुख्यदंडाधिकाऱ्यांचा दालनात हजेरी लावली असून अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली आहे.


विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने कोल्हापूरमधून अमल महाडीक यांना उमेदवारी दिली होती. मात्र अमल महाडीक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सत्तेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.


जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा टाकला असून १२ जणांच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे.


संविधान दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.


संविधान दिनानिमित्ताने संसद भवनात विशेष कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्रार्यक्रमाला उपस्थितीत झाले आहेत.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मुल्यांच्या विरोधात आहे.


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.


राज्यभरात एसटी संपात फूट झाली असून पगारवाढीनंतर अनेक एसटी कामगार कामावरू रुजू होत आहेत. औरंगाबाद, सातारा, रत्नागिरीतील एसटी कर्मचारी कामावर परतले आहोत. काल राज्यात ४५७ एसटी रवाना झाल्या असून ११ हजार १८८ प्रवाशांची प्रवास केला.


मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थितीत होते.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे.


देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईला आजचा दिवस हादरवणारा दिवस होता. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये पाकिस्तानाची दहशतवाद्यांनी समुद्र मार्गे येऊन मुंबईतील काही ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला. आज यानिमित्ताने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर मंत्री सकाळी ९ वाजता सीपी कार्यालय, क्रॉफर्ड मार्केट येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.


तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाली आहेत. जरी मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी अजूनही काही मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे हरयाणा, पंजाबमधून शेकडोहून अधिक शेतकरी दिल्ली बॉर्डरवर पोहोचले आहेत.


आजच्या दिवशी संविधान दिवस देखील साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ साली संविधान सभेने आपली संविधान राज्यघटना विधिवत स्वीकारली होती. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले होते.