अग्नी – 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम

India successfully tests Agni-4 missile

भारताने अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी सक्षम अग्नी – 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अग्नी-4 क्षेपणास्त्र 4,000 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली. या पूर्वी अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही चाचणी करण्यात आली. अग्नी -4 ची यशस्वी चाचणी भारताच्या विश्वासनीय किमान प्रतिबंधच्या धोरणाची पुष्टी करते. चाचणीने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच सिस्टमची विश्वासार्हता सिद्ध केली, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

भारतातीय नैदलाने सीकिंग हेलिकॉप्टर मधून अलिकडेच स्वदेशी विकसित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक चाचणी श्रीणी येथे ही चाचणी करण्यात आली. यावेळी भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे सुपसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली