घरदेश-विदेशभारतीय पर्यटन प्रेमी दाम्पत्याचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू

भारतीय पर्यटन प्रेमी दाम्पत्याचा अमेरिकेत दुर्दैवी मृत्यू

Subscribe

भारतीय पर्यटन प्रेमी दाम्पत्याचा अमेरिकेच्या ८०० फुट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

एका भारतीय दाम्पत्यांचा अमेरिकेतील खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दाम्पत्यांना फिरण्याची आवड असल्याने ते विविध देशांमध्ये फिरायला जायचे. असेच ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान त्यांचा ८०० फुट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विष्णू विश्वनाथ (२९) आणि मीनाक्षी मूर्थी (३०) असे या पती पत्नीचे नाव असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

नेमके काय घडले?

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध टाफ्ट पॉइंट या दुर्गम पहाडी भागात पर्यटनासाठी गेले होते. पार्कच्या माहितीनुसार त्यादरम्यान त्यांचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या गुरुवारी लष्कराच्या जवानांना या पहाडी भागात या दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच योसेमिटी नॅशनल पार्कचे अधिकारी सातत्याने या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यानंतर त्यांना अखेर सोमवारी हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

- Advertisement -

हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स ब्लॉग

विष्णू विश्वनाथ आणि मीनाक्षी मूर्थी या दोघांना फिरण्याची प्रचंड आवड असल्याने ते देश – विदेशात फिरायचे. तसेच ज्या ठिकणी फिरायला जायचे त्या ठिकाणाविषयी हे दामप्त ‘हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स’ या ब्लॉगवर लिहायचे.

- Advertisement -

विष्णू आणि मीनाक्षीविषयी थोडस

या दोघांनी २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींग केले होते. विश्वनाथ यांना सिस्को कंपनीत सिस्टिम इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाल्यानंतर हे दामप्त न्यूयॉर्कमध्ये स्थानिक झाले असल्याची माहिती अमेरिकन माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे. या दोघांनाही फिरण्याचा छंद होतो. त्यासाठी ते फिरण्याचे विविध अनुभव आपल्या ब्लॉगवर लिहीलेले पाहायला मिळत आहे. मात्र हे दोघे दरीत कसे काय पडले? ही घटना कशी घडली? हे दोघे त्यावेळी तिथे काय करत होते? याबाबत स्थानिक पोलीस प्रशासन शोध घेत आहेत.

वाचा – महाबळेश्‍वरमध्ये प्रेमीयुगुलाची दरीत उडी मारून आत्महत्या

वाचा – आंबेनळी घाटात कार दरीत कोसळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -