घरदेश-विदेशनिवडणुकीतील इस्रायली कंपनीच्या कथित हस्तक्षेपाची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

निवडणुकीतील इस्रायली कंपनीच्या कथित हस्तक्षेपाची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

Subscribe

नवी दिल्ली : भारताच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी इस्रायलमधील कंपनीचा कथित वापर करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी केली. इस्रायलच्या हेरगिरी करणाऱ्या एका फर्मच्या युनिटने भारतासह जगभरातील 30हून अधिक देशांतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा आणि सुप्रिया श्रीनेत यांनी सरकारने याबाबतचे मौन सोडले पाहिजे, असे सांगितले. इस्रायली युनिट ‘टीम जॉर्ज’ आणि भाजपाच्या आयटी सेलचा संदर्भ देत पवन खेरा यांनी, देशातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अपप्रचार आणि ‘फेक न्यूज’ पसरवली जात असल्याचा दावा केला. भारतातील नागरिकांचा डेटाशीही खेळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्ताधारी पक्षाकडूनच भारतातील लोकशाहीचे अपहरण केले जात आहे. देशाच्या लोकशाहीवर दबाव टाकण्यासाठी इस्रायलच्या एजन्सीची मदत घेतली जात आहे. भारतात बसून इतर देशांशी हातमिळवणी करत ते भारताच्या लोकशाहीविरुद्ध कारस्थान रचत आहेत, अशी टीका खेरा यांनी केला.

- Advertisement -

इस्रायली कंपनीने 30 निवडणुकांमध्ये हेराफेरी केली, यात भारतातील निवडणुकांचाही समावेश आहे. पण मोदी सरकार गप्प का? पेगॅससवर मोदी सरकार काही बोलले नाही? या फेक न्यूजमध्ये भाजपाच्या आयटी सेलचा आणि त्यांच्या कथित भागीदारांचा काय सहभाग आहे? असा सवाल सुप्रिया सुनेत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -