घरदेश-विदेशझारखंडच्या कारागृहातील खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; 15 दोषींना ठोठावली फाशीची शिक्षा

झारखंडच्या कारागृहातील खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; 15 दोषींना ठोठावली फाशीची शिक्षा

Subscribe

कारागृहातील खून प्रकरणात झारखंडच्या एका न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात चक्क 15 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. झारखंडमधील पूर्व सिंधभूम जिल्ह्यातील घगिडीह मध्यवर्ती कारागृहात 25 जून 2019 रोजी दोषी कैदी मनोज सिंगच्या हत्या झाली, या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश प्रसाद सिन्हा यांनी बुधवारी 15 दोषींना फाशीची तर उर्वरित सात दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सर्व शिक्षा झालेले कैदी घगिडीह कारागृहात कैदी आहेत.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये वासुदेव महतो, अरुप कुमार बोस, अजय मल्लाह, गोपाल तिरिया, श्यामू जोजो, शिव शंकर पासवान, गंगा खंडैत, जानी अन्सारी, पंचानंद पात्रो, पिंकू पूर्ती, संजय दिघी, शरद गोप, राम राय सुरीन आदींचा समावेश आहे. खून झालेला आरोपी मनोज सिंग हा टेल्को मनीफिटचे रहिवासी होता. गँगस्टर अखिलेश सिंग गिरोह टोळीतील हरीश सिंगचा तो साथीदार होता. मात्र तुरुंगातच त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

- Advertisement -

25 जून 2019 रोजी अखिलेश सिंग टोळीचा हरीश सिंग आणि दोषी कैदी पंकज दुबे यांच्यात घगीडीह कारागृहातील टेलिफोन बूथवर बोलण्यावरून वाद झाला. यावेळी हरीश सिंग टोळीचे सदस्य सुमित सिंग, मनोजकुमार सिंग, अविनाश श्रीवास्तव आदी त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंकज दुबे याला मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षा झालेल्या कैद्यांनी हरीश सिंग टोळीवर हल्ला केला.

हल्ल्या दरम्यान मनोज सिंग पळून गेला आणि तुरुंगातील आरुणी कक्षाच्या वरच्या मजल्यावर लपला. यावेळी 15 दोषी कैद्यांनी आत घुसून मनोज सिंगला बेदम मारहाण केली. यावेळी मनोज सिंगला तुरुंगातून साकची येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले. तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीवरून परसुडीहमध्ये या हत्येचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने दोषींना आज शिक्षा सुनावली आहे.


IMF कडून कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान गरिबांच्या पोटावर मारणार लाथ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -