घरदेश-विदेशKarnataka Election : फडणवीसांकडून विरोधी पक्षाचा प्रचार; एकीकरण समिती दाखवणार 'काळे झेंडे'

Karnataka Election : फडणवीसांकडून विरोधी पक्षाचा प्रचार; एकीकरण समिती दाखवणार ‘काळे झेंडे’

Subscribe

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) अवघे काही दिवस बाकी असल्याने राजकीय पक्षांच्या प्रचारांनी जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेतेही प्रचारात सहभाग नोंदवत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोध पक्षाचा प्रचार करत असल्याने एकीकरण समिती त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुक येत्या 10 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपासमोर काँग्रेस, जेडीएसने मोठे आव्हान उभे केले आहे आणि या निवडणुकीत आपल्या पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेही सहभाग नोंदवत असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू शकतो. कारम ठाकरे गटाचे नेते संजय राऊत बुधवारी (3 मे) कर्नाटक दौऱ्यावर गेले आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावर गेले आहेत.

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीत मराठी उमेदवारांविरोधात सीमाभागात आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची बेळगावमध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी माणसांनी राज्यातील नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती फडणवीस यांच्या सभेत काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे. याबाबतची घोषणा खासदार संजय राऊत यांनी बेळगावमधील जाहीर सभेनंतर समितीकडून व्यासपीठावरच करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, सांगली जिल्ह्यातील काही सीमावर्ती भागातील गावांवर दावा ठोकला होता. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाल्यामुळे सीमावादाचा मुद्दा चांगलाच चिघळल्याचे पाहायला मिळाले होते. महाविकास आघाडीसह ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारला सीमावादावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीच्या प्रत्येक वेळी मराठी भाषिकांचा मुद्दा उचलून धरला जातो. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकीत भाजपला अडचणीत आणण्यासाठी मराठी भाषिक, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उचलून धरला आहे. संजय राऊत यांनी बुधवारी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेत सीमावादावरुन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -