घरदेश-विदेशकोळशाच्या तुटवड्यामुळे देशात मोठं वीज संकट, जम्मू-काश्मीर ते आंध्रपर्यंत 2 ते 8...

कोळशाच्या तुटवड्यामुळे देशात मोठं वीज संकट, जम्मू-काश्मीर ते आंध्रपर्यंत 2 ते 8 तासांची वीजकपात, देशात कुठे तुटवडा?

Subscribe

देशातील 70 टक्के वीज कोळशातून निर्माण होते. मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचा दावा सरकार करत आहे, परंतु वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा नऊ वर्षांतील सर्वात कमी आहे. खरे तर देशात उत्पादित होणाऱ्या विजेपैकी 70 टक्के वीज कोळशापासून तयार होते.

नवी दिल्लीः Power Crisis: सध्या देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यांमध्ये कुठे 2 तास वीज गायब असते, तर कुठे 5 ते 8 तास लोक वीज समस्येशी झगडत असतात. देशातील एकूण विजेचा तुटवडा 623 दशलक्ष युनिटपर्यंत पोहोचला आहे. मार्चमधील एकूण वीजटंचाईपेक्षा हा आकडा अधिक आहे. या संकटाचा केंद्रबिंदू हा कोळशाच्या तुटवड्यात आहे. देशातील 70 टक्के वीज कोळशातून निर्माण होते. मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचा दावा सरकार करत आहे, परंतु वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा नऊ वर्षांतील सर्वात कमी आहे. खरे तर देशात उत्पादित होणाऱ्या विजेपैकी 70 टक्के वीज कोळशापासून तयार होते. मात्र, यावेळी कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.

देशात एकूण 623 कोटी युनिट्सचा तुटवडा

यूपी- 3000 मेगावॅट
पंजाब – 1550 मेगावॅट
तामिळनाडू- 750 मेगावॅट
जम्मू आणि काश्मीर – 500 मेगावॅट
हरियाणा – 300 मेगावॅट

- Advertisement -

कोळशाचा तुटवडा आणि वीज संकटाबाबत विरोधकांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यूपीतील वीज कपातीला राजकीय रंग आला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव लखनौमध्ये एका इफ्तार कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाचे मतदार जिथे राहतात, तिथे जास्तीत जास्त वीज कापली जात असल्याचा आरोप केला. अखिलेश यादव म्हणाले की, ओमर अब्दुल्ला जे बोलले त्यात पूर्ण तथ्य आहे. उत्तर प्रदेशात, ज्या भागात सपा मतदार राहतात, तेथे मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला आहे. अखिलेश यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री ए. के. शर्मा यांनी विजेचा तुटवडा असल्याची कबुली दिली, मात्र कोणत्या भागात किती कपात केली जात आहे यावर ते बोलले नाहीत.

याआधी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही रमजानच्या वीज कपातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “मला आश्चर्य वाटते की उर्वरित दिवस आणि रात्री वीज का असते, पण इफ्तारच्या वेळी का नाही,” तो म्हणाला. तुम्ही सेहरी खाण्यासाठी जाता आणि वीज नसते आणि इफ्तारच्या वेळीसुद्धा असेच होते. नमाजाच्या वेळी वीज नसते आणि नमाज संपल्यावर वीज पूर्ववत होते.

- Advertisement -

हेही वाचाः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर मोदींचा उपाय, राज्यांना दिला हा सल्ला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -