घरदेश-विदेश...तर पॅनकार्ड होईल बिनकामाचे, चुकूनही करु नका ही चूक

…तर पॅनकार्ड होईल बिनकामाचे, चुकूनही करु नका ही चूक

Subscribe

आता पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

पॅनकार्ड देशातील करदात्यांचे ओळखपत्रच आहे. आपली आर्थिक स्थिती पॅनकार्डच्या माध्यमातून समोर येते. सध्याच्या काळात जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर तुमची अनेक महत्त्वाची कामे मध्येच अडकून पडतात. आता तर पॅनकार्डमध्ये काही त्रुटी असल्यास अनेक महत्त्वाची कामे मध्येच अडकून पडतात, त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.

आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या सल्ल्यानुसार ३१ मार्च २०२३ पूर्वी दोन्ही ओळखपत्र लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. याचा परिणाम म्हणून तुम्हाला आयकर रिटर्न भरताना किंवा पॅन संबंधित सेवांचा लाभ घेताना अडचणी येतील.

- Advertisement -

पॅन-आधार लिंकिंग आवश्यक आहे. आयटी विभागाने जारी केलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की आयटी कायद्यानुसार, सर्व पॅन-धारकांसाठी हे अनिवार्य आहे. हे अनिवार्य असून आता उशीर करू नका, आजच पॅन आधारशी लिंक करा! आयटी कायद्यानुसार, सर्व पॅन-धारकांसाठी, जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत, त्यांनी त्यांचा पॅन क्रमांक 31 मार्च 2023 पूर्वी आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. 1 एप्रिल 2023 पासून, लिंक न केलेले पॅन निष्क्रिय होणार आहे.”

पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते प्राप्तिकर रिटर्न जमा करु शकणार नाहीत. तसेच त्यांना थकबाकीचीही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. रिटर्नमध्ये त्रुटी असेल तर ती पूर्ण करता येणार नाही. तसेच कर कपातही जादा दराने होईल.

- Advertisement -

म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट अथवा बँकेतील खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. ते निष्क्रिय झाल्यास या सेवा मिळणार नाहीत. बंद झालेल्या पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येणार नाही. असा प्रयत्न केल्यास तुम्हाला दंड लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961 चा नियम 272 B नुसार, तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -