घरक्राइमदिल्लीत आणखी एक 'लिव्ह-इन' हत्या; आरोपी रोज रात्री पाहायचा महिलेचा मृतदेह

दिल्लीत आणखी एक ‘लिव्ह-इन’ हत्या; आरोपी रोज रात्री पाहायचा महिलेचा मृतदेह

Subscribe

दिल्लीत 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या श्रद्धाचे प्रियकर आफताब याने हत्या करत 30 तुकडे केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आणखी एका 'लिव्ह-ईन'मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. गुलशना असे त्या तरुणीचे नाव असून, राहुल असे त्या आरोपीचे नाव आहे.

दिल्लीत ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या श्रद्धाचे प्रियकर आफताब याने हत्या करत ३५ तुकडे केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आणखी एका ‘लिव्ह-ईन’मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. गुलशना असे त्या तरुणीचे नाव असून, राहुल असे त्या आरोपीचे नाव आहे. गुलशनाचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याच्या संशयाखाली आरोपी राहुलने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर राहुल रोज रात्री गुलशनाचा मृतदेह पाहण्याराठी घरी जात होता. मात्र, गुलशनाच्या हत्येनंतर राहुल फरार झाला होता. परंतु, पाच दिवसांनंतर पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. (Live In Partner Kills Woman In Delhi S Sarita Vihar)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता विहार पोलिसांना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.25 वाजताच्या सुमारास मदनपूर खादर येथील एका घरात एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडली असून, घराला बाहेरून कुलूप असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर एसीपी सरिता विहार जगदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्ञानेंद्र राणा, एसआय दीपक धांडा, एएसआय लियाकत अली आणि एएसआय रमेश कुमार यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासावेळी पोलिसांच्या पथकाला घरमालक परम बिधुरी घटनास्थळी सापडला. ज्या घरात गुलशना होती, त्या घराला बाहेरून कुलूप होता. पोलिसांनी त्या खोलीचा कुलूप तोडत दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना एक तरुणी (गुलशना) बेशुद्धअवस्थेत पडल्याचे दिसले. पोलिसांनी गुलशनाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर गुलशनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी गुलशनाची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे याप्रकरणी तपास केला असता, त्या गुलशनाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नव्हत्या.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुलशनाची हत्या केल्यानंतर राहुल तिच्या मृतदेहासोबत ९ तास त्या खोलीत राहिला होता. मात्र, त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी त्याला अखेर पाच दिवसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी घरमालक परमची चौकशी केला असता, त्याने सांगितले की, राहुल हा सुमारे २० दिवस माझ्या घरात भाड्याने राहत होता. राहुलने त्याला फोन करून त्याची मैत्रिण गुलशना घरात मृतावस्थेत पडल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राहुलचा भाऊ प्रवीण याच्याशी संपर्क साधला. राहुलचे कुटुंबही मदनपूर खादर येथे राहते. प्रवीणने सांगितले की, राहुल एका तरुणीसोबत २० दिवसांपासून ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होता. तसेच, त्या तरुणीला एक वर्षाची मुलगीही आहे.

हत्येनंतर सुरूवातीला पोलिसांनी गुलशनाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद केली. मात्र शवविच्छेदनात गुलशनाची गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसआय दीपक धांडा, एएसआय लायक अली आणि रमेश कुमार यांच्या पथकाने तरुणीच्या हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अखेर पोलीसांच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी राहुलला अटक केली.

दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राहुलला गुलशनावर संशय होता की तिचे कोणासोबत तरी अवैध संबंध आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये रोज भांडण व्हायचे. गुलशनाने त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी गुलशनाचा गळा आवळून तिची हत्या केली आणि रात्री १० वाजेपर्यंत गुलशनाच्या एक वर्षाच्या मुलीसोबत मृतदेहाजवळ थांबला. त्यानंतर रात्री १० वाजता तो मुलीसह पळून गेला. मुलगी कुणाला तरी देऊन पळून गेला. यानंतर आरोपी रात्री २ वाजता गुलशनाचा मृतदेह पाहण्यासाठी घरी आला.


हेही वाचा – हम सब एक है; सर्वच पक्षातील बडे नेते जामीनावर अन् राजकारणात सक्रिय!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -