घरCORONA UPDATEलॉकडाऊन ५ : तयारी झाली.. 'या' शहरात लॉकडाऊनमध्ये शिथीलता नाहीच!

लॉकडाऊन ५ : तयारी झाली.. ‘या’ शहरात लॉकडाऊनमध्ये शिथीलता नाहीच!

Subscribe

कॅबिनेट सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत शहरांमध्ये कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

येत्या रविवारी लॉकडाऊनच्या ४ थ्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन ५ ची सुरूवात केली आहे. या संदर्भात कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये १३ शहारातील नगर आयुक्त, एसपी यांचा समावेश करण्यात आला होता. लॉकडाऊन ५ च्या काळात शहरातील हॉटस्पॉट असलेल्या शहरात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येईल आणि इतर ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात येतील.

कोरोना प्रकरणांची झपाट्याने वाढणारी संख्या हे सरकारच्या चिंतेचे कारण आहे. पण दिलासा देणारी बाब अशी की कोरोनामधील ७०  टक्के पेक्षा जास्त केसेस या १३  शहरापुरत्याच मर्यादित आहेत. ही शहरे मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदूर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तेरुवल्लूर अशी आहेत. अर्थात, या शहरांमध्ये कोरोना प्रकरणे योग्यप्रकारे हाताळली गेली तर उर्वरित देशात कोरोना पसरण्यापासून रोखता येऊ शकतो.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट सचिवांनी बैठकीत शहरांमध्ये कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. या शहरांमध्ये कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासठी स्थानिक प्रशासनाच्या सीमा जाणून घेतल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये या शहरांतील प्रत्येक लाख लोकसंख्येच्या कोरोनाच्या तपासणीचे तपशीलवार सादरीकरण केले गेले, त्यातील रुग्णांचे प्रमाण त्यात सकारात्मक असल्याचे दिसून आले,  कोरोना प्रकरणे दुप्पट करण्यास लागणारा कालावधी आणि परिणामी मृत्यूचे प्रमाण या विषयावर सविस्तर सादरीकरण केले गेले.

कॅबिनेट सेक्रेटरी म्हणाले की, या शहरांमध्ये कोरोनाचे वाढत जाणारे संक्रमाण थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली आहेत आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत स्थानिक प्रशासन रेड झोन परिसरास संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याबरोबरच घराघरात जाऊन सर्व्हेक्षण व अधिकाधिक लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

१३ शहरांव्यतिरिक्त कॅबिनेट सचिवांनी जागरूक राहण्याचे निर्देश दिले. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशासारख्या राज्यात जेथे मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार परत येत आहेत आणि बर्‍याच जणांना कोरोनाची लागणही होत आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांची अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

बैठकीत लॉकडाऊन ५ विषयी कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. शनिवारपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. पण कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत लॉकडाउन -५ मध्ये हॉटस्पॉट्स असलेल्या भागातील निर्बंधांवर पूर्ण भर दिला जाईल यावर चर्चा करण्यात आली.


हे ही वाचा – औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराचा अचानक मृत्यू, कोरोना चाचणी केली पण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -