घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासात ४५८ कोरोनाबाधितांची नोंद, ६ रुग्णांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासात ४५८ कोरोनाबाधितांची नोंद, ६ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

२४ तासात बाधित रुग्ण – ४५८ २४ तासात बरे झालेले रुग्ण -३३४ बरे झालेले एकूण रुग्ण -७२५५८१ बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७% एकूण सक्रिय रुग्ण-४०१० दुप्पटीचा दर -१२०६ दिवस कोविड वाढीचा दर (२सप्टेंबर ते ८सप्टेंबर)-०.०६%

- Advertisement -

आमचं बँक खातं मुंबईत, मग पुण्यातून सर्क्युलर का? – नितेश राणे (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

आमची अडचण आहेच नाही. आता मुंबई क्राईम ब्रांचची अडचण होणार आहे. महाविकास आघाडी सरकारची अडचण होणार आहे. आम्ही ५ महिन्यांपुर्वी पत्र लिहून सांगितले आहे त्यामुळे आमची अडचण होणारच नाही.

- Advertisement -

पुणे क्राईम ब्रांचच नीलम राणे, नितेश राणेंविरोधात लुकाऊट सर्क्युलर जारी

आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडनं २५ कोटींचं कर्ज घेतलं

दोघांवर कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप
डीएचएफएल कंपनीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
डीएचएफएलकडून ४० कोटीचं कर्ज घेतलं होते.  (सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


मनसुख हिरेन प्रकरणात पोलीस कोठडीमध्ये असलेल्या आरोपी सचिन वाझेला न्यायालयाचा दिलासा

वैद्यकीय उपचारासाठी सचिन वाझेला खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी

वोकहार्ट रुग्णालयात होणार सचिन वाझेवर उपचार, पत्नीला सोबत राहण्याची मुभा (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून छगन भुजबळांची मुक्तता

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला.


शहापूरात बिबट्याचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू

वासिंद जवळील वांद्रे खोर जवळील घाटाळ पाडा येथील एका बोडक्या विहीरीत पडून एका नर जातीच्या तीन वर्ष आयुर्मान असलेल्या बिबट्याचा पाण्यात गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा येथे उघडकीस आली आहे.तब्बल चार दिवस अगोदरच बिबट्या विहिरीत पडून मृत पावलेला असतानाही याचा साधा थांगपत्ता ही शहापूर प्रादेशिक विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांना नसल्याने वन्यप्राणी प्रेमींमध्ये एकच संताप व्यक्त होत आहे.गुरुवारी सकाळी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे


गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून पुण्यात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत


राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर; २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर ४ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार असून त्याचा निकाल ४ ऑक्टोबर रोजीच होणार जाहीर


बुधवारी महाराष्ट्रात १५ लाखांहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले, राज्यात एकाच दिवसात लसीकरणाचा नवा विक्रम


देशात पुन्हा कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ४३,२६३ नव्या बाधितांची नोंद

गेल्या २४ तासात भारतात ४३ हजार २६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात देशात ४० हजार ५६७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. गेल्या २४ तासात कालच्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत साधारण ६ हजारांनी झाली वाढ


राज्यात ५ जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता

येत्या २४ तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ओरेंज अलर्ट; मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी नाशिक पुणे या राज्यात ५ जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता


किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर, दुपारी ३ वाजता घेणार पत्रकार परिषद

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. राजकीय नेत्यांच्या पुण्यातील अवैध बांधकामांबाबत सोमय्या माहिती उघड करणार असून दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार


T20 World साठी भारतीय संघाची घोषणा

 


शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दुपारी साडे बारावाजेच्या सुमारास वर्षा निवास्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध घडामोडी, राज्यपाल नियुक्तं ११ आमदारांचा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता


गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात जमावबंदी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी ७ हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार


आजपासून ब्रिक्स परिषदेच्या १३ व्या शिखर परिषदेस सुरुवात

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी आज ब्रिक्स परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. पंतप्रधान मोदी पाच देशांच्या ब्रिक्स गटाच्या वार्षिक शिखर परिषदेचे अध्यक्ष असणार असून या बैठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित असणार आहे.


बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत ६ जण दगावले असून २९ पशुधनाची हानी झाली आहे. तर २० ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -