घर ताज्या घडामोडी बंगळुरूमध्ये दुचाकी स्वारानं वृद्धाला नेलं फरफटत , व्हिडीओ व्हायरल

बंगळुरूमध्ये दुचाकी स्वारानं वृद्धाला नेलं फरफटत , व्हिडीओ व्हायरल

Subscribe

कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका वृद्धाला दुचाकी स्वाराने फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराने कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर कार चालकाने दुचाकी स्वाराला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तिथून पळून जाऊ लागला. दरम्यान, कार चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वाराने त्याला फरफटत नेलं. या घटनेत वृद्धाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूमधील मागदी रोडवर घडली आहे. आरोपी तरुण हा मेडिकल सेल्समन आहे. तर कार चालकाचं नाव मुथप्पा असून तो ५५ वर्षीय वृद्ध आहे. दुचाकी स्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गोविंदराज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वारीने जेव्हा वृद्धाला फरफटत नेलं तेव्हा इतर वाहन धारकांनी त्याचा पाठलाग केला. आपले वाहन आडवे घालून त्याला थांबवलं. लोक त्याला दुचाकी थांबवण्यासाठी आवाजही देत होते. तरीही त्याने ऐकलं नाही. परंतु तरुणाच्या या कृत्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी दुचाकी स्वाराविरुद्ध आयपीसीच्या कलम ३३७, ३३८ आणि ३०७ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.


- Advertisement -

हेही वाचा : KCR, अखिलेश आणि केजरीवाल येणार एकाच मंचावर; दक्षिणेत चौथी आघाडी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -