घरठाणेअनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी तरुण पोलिसांची फौज हवी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी तरुण पोलिसांची फौज हवी

Subscribe

पालिका प्रशासनाचे पोलिसांना निवेदन

ठाणे । महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वाढत्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संबंधित विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखणी सुद्धा केली. पण ही कारवाई करताना, महापालिकेला पोलीस बंदोबस्तात व्याधीग्रस्त किंवा वय वाढलेले नको तर तरुण पोलिसांची फौज हवी आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने तशा प्रकारच्या मागणीचे निवेदनपत्र पोलीस आयुक्तांना दिले आहे. अशी माहिती महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

शहरातील वाढत्या अनाधिकृत बांधकामांवरून राजकीय पक्षांकडून महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले जात आहे. त्यातच महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानंतर मागील आठवडाभरात प्रभाग समितीनिहाय कारवाई करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु आता सध्या सुरु असलेली बांधकामे, काही पूर्ण झालेली बांधकामे आणि शेवटच्या टप्यात पूर्ण होईन त्यात वास्तव्यास असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची रुपरेषा आखण्यात आली आहे. त्यानुसार ही कारवाई कशा पध्दतीने असावी याची माहिती देखील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

परंतु यापूर्वी देखील कारवाई करीत असतांना महापालिका अधिकार्‍यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असतो. परंतु पोलीसांकडून पालिकेला व्याधीग्रस्त, वाढत्या वयोमानाचे पोलीस या कामी दिले जात आहेत. त्यामुळे कारवाई करतांना देखील पालिका अधिकार्‍यांच्या मनात काहीशी भिती निर्माण झालेली असते. त्यामुळे आता असे पोलीस न देता तरुण पोलिसांची फौज मिळाल्यास कारवाई करतांना पालिका अधिकार्‍यांना देखील भिती वाटणार नाही. त्यामुळे यापुढे अशी फौज मिळावी अशीच अपेक्षा पालिकेने व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -