घरताज्या घडामोडीधनबादच्या आशीर्वाद टॉवरला भीषण आग, ३ जणांचा मृत्यू

धनबादच्या आशीर्वाद टॉवरला भीषण आग, ३ जणांचा मृत्यू

Subscribe

झारखंडमधील धनबादच्या एका आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १४ हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांमध्ये एका ५ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. या घटनेत १४ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर स्थानिक पीएमसीएच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जिल्हा प्रशासनाने ५० हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी मागवल्या आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.

- Advertisement -

एकीकडे सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या मजल्यावरील दिव्याच्या ज्वालामुळे आग लागली आणि ती खालच्या मजल्यापर्यंत पसरल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या टॉवरला आग नेमकी कशी लागली?, हे अद्यापही अस्पष्ट आहे.

- Advertisement -

दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी येणाऱ्या वाहनांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांनी शक्ती मंदिर रस्ता बंद केला आहे. घटनास्थळी शेकडोहून अधिक लोक जमा झाले आहेत. या अपार्टमेंटमध्ये ५० हून अधिक लोकं अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -