घरताज्या घडामोडीदिल्ली महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? आज लागणार निकाल

दिल्ली महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? आज लागणार निकाल

Subscribe

दिल्ली महानगरपालिकेच्या मतदानाचा आज निकाल लागणार आहे. दिल्लीत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या मतदानाचा आज निकाल लागणार आहे. दिल्लीत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निकालानंतर दुपारी तीन वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे भाषण होणार आहे. (mcd result of the delhi municipal corporation elections will be announced today)

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पक्षासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झाले. यावेळी 50 टक्के मतदान झाले. त्यामुळे या 50 टक्के मतदानात कोणत्या पक्षाला सर्वाधिक मतं पडली आहेत, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिल्लीत 13 हजार 638 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी प्रभाग क्रमांक 5 बख्तावरपूर येथे 65.72 टक्के तर सर्वात कमी 33.74 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 145 अँड्र्यूज गंज येथे झाले होते.

आजच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 तुकड्यांसह 10 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

एक्झिट पोल काय सांगतात?

एक्झिट पोलनुसार, आपला या निवडणुकीत 149 ते 171 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या एक्झिट पोलनुसार भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीत भाजपला 69 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या खात्यात 03 ते 07 जागा येत आहेत. तसेच इतरांचा 05 ते 09 जागांवर विजय होण्याची शक्यता आहे.

व्होट शेअरिंगनुसार, आम आदमी पक्षाला 43 टक्के, भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 10 टक्के मते मिळू शकतात, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

दिल्ली महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपने तब्बल सात मुख्यमंत्री, 17 कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले होते. मात्र, एक्झिट पोलनुसार आप या निवडणुकीत भाजपचा पराभव करेल असे सांगितले जात आहे. मात्र, आज निकाल लागल्या नंतरच कोण बाजी मारणार हे समजणार आहे.


हेही वाचा – सीमाप्रश्नी आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, शिंदेंनी बोम्मईंना फोन केल्यानंतर केले ट्विट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -