केंद्राचा मोठा निर्णय; 1 जूनपासून साखर निर्यातीवर बंदी

सध्या घाऊक बाजारपेठेत साखरेचा भाव 3150 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल आहे. तर किरकोळ किमतीवर नजर टाकली तर देशाच्या विविध भागात त्याचा दर 36 ते 44 रुपयांपर्यंत आहे.

modi government imposes restrictions on sugar exports from june 1 minstry of consumer affairs
केंद्राचा मोठा निर्णय; 1 जूनपासून साखर निर्यातीवर घातली बंदी

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ आता साखर (Sugar Exports) निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या 1 जूनपासून देशातील साखर निर्यातीवर बंदी येणार आहे. साखरेच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि देशातील साखर पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे केंद्राने (Central Government) स्पष्ट केले. ही बंदी यंदा 31 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक मंत्रालयाने दिली आहे. (Ministry of Consumer Affairs) यापूर्वी देखील गव्हाच्या निर्यातीवर केंद्राने बंदी घातली होती.

दरम्यान ज्या पद्धतीने साखरेचे (Sugar rate) भाव वाढत होते त्यावरून गव्हापाठोपाठ केंद्र साखरेच्या निर्यातीवरही बंदी घालू शकते, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यानुसार आता केंद्राने पाऊल टाकले आहे. साखर हंगामाच्या शेवटी (30 सप्टेंबर 2022) साखरेचा क्लोजिंग स्टॉक 60 – 65 एलएमटीपर्यंत राहील, असे सांगण्यात येत आहे, त्यामुळेच सरकारने निर्यातीबाबत हा कठोर निर्णय घेतला आहे.

दरम्यान केंद्र सरकारला किमान दोन ते तीन महिन्यांचा साखरेचा साठा आपल्याकडे ठेवायचा आहे. जेणेकरून देशातील जनतेची वाढती मागणी पूर्ण करता येईल. कारण आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत देशाने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात केली. मात्र गतवर्षी 60 लाख मेट्रिक टन साखर (Sugar) निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते पण प्रत्यक्षात 70 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाल. त्याचप्रमाणे यंदाही साखर कारखान्यातून 82 लाख मेट्रिक टन साखर निर्यातासाठी पाठवण्यात आली तर 78 लाख मेट्रिक टन साखर ही निर्यात झाली आहे. यंदाची साखर निर्यात ही आत्तापर्यंतची सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.


सध्या घाऊक बाजारपेठेत साखरेचा भाव 3150 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल आहे. तर किरकोळ किमतीवर नजर टाकली तर देशाच्या विविध भागात त्याचा दर 36 ते 44 रुपयांपर्यंत आहे. दरम्यान केंद्र सरकार दीर्घकाळापासून साखरेच्या उत्पादन आणि निर्यातीवर लक्ष ठेवून आहे. अशआ परिस्थितीत देशातील जनतेला प्राधान्य देत केंद्राने निर्यातीवर काही निर्बंध घातले आहेत.

केंद्र सरकारने आपल्या आदेशात हे देखील स्पष्ट केले आहे की, सीएक्सएल आणि टीआरक्यू अंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेत निर्यात होणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू होणार नाहीत. या भागात CXL आणि TRQ अंतर्गत विशिष्ट प्रमाणात साखर निर्यात केली जाते. मात्र या देशांशिवाय इतर कोठेही साखर निर्यात होणार नाही. 1 जूनपासून भारताने साखर निर्यात प्रतिबंधित श्रेणीत ठेवली आहे.


हेही वाचा : Texas School Shooting : अमेरिकेच्या शाळेत अज्ञाताकडून बेछूट गोळीबार, १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू