घरताज्या घडामोडीमोदी सरकारचा नवा भाडेकरू कायदा नक्की आहे तरी काय? काय आहेत नव्या...

मोदी सरकारचा नवा भाडेकरू कायदा नक्की आहे तरी काय? काय आहेत नव्या तरतूदी जाणून घ्या

Subscribe

नवीन कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरू यांच्या वाद झाल्यास त्वरित तोडगा काढण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मोदी सरकारने बुधवारी मॉडेल टेन्सी कायद्याच्या (Model Tenancy Act ) मसुद्याला मंजुरी दिली. मॉडेल टेन्सी कायदा म्हणजे नवा भाडेकरु कायदा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कायदा लागू करण्याची मागणी केली जात होती. देशाच्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitaraman) यांनी भाडेकरू कायदा लागू करण्याची घोषणा केली होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्र मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला. या कायद्यामुळे आता घर भाड्याने देणे आणि घेणे आणखी सोपे होणार आहे. त्याचबरोबर हा कायदा देशातील सर्व राज्यात एकसमान असणार आहे. भाडेकरू कायद्यामुळे मालमत्तेवर कोणी कब्जा करू शकणार नाही आणि भाडेकरूला अचानक घरी खाली करावे लागणार नाही. नक्की काय आहे हा नवा कायदा आणि त्याच्या तरतूदी जाणून घ्या. (Modi government new Model Tenancy Act What are the new provisions?)

मोदी सरकारने दुरुस्त केलेल्या या कायद्याला आदर्श घर भाडेकरू कायदा असे म्हणण्यात येत आहे. या कायद्यामुळे देशातील भाड्याच्या मालमत्तेवर लक्ष ठेवता येणार आहेत. प्रामुख्याने जे लोक बेघर आहेत अशा लोकांना या कायद्याचा सर्वात मोठा उपयोग होणार आहे. देशात घरांच्या भाड्यांवरुन होणारे सगळे व्यवहार नव्या तरतूदींमुळे कायद्याच्या आख्यारित येणार आहेत. त्याचप्रमाणे अनेकांची पडून असलेली मालमत्ता भाड्याने दिल्यास त्याचे संरक्षण होईल. देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला या कायद्यामुळे चालना मिळणार आहे. गेल्या काही काळापासून अनेक एजेंसी या व्यवसायात उतरल्या आहेत. घर खरेदी करण्याप्रमाणेच घर भाड्याने देण्याचा व्यवसायालाही चालना मिळेल.

- Advertisement -

काय आहेत भाडेकरू कायद्याच्या नव्या तरतूदी?

  • जागेचे भाडे बाजार भावानुसार द्यावे लागणार.
  • २ महिने घराचे भाडे थकवल्यास घराचा ताबा घेण्यात येईल.
  • मनमानी भाडी आकारण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. दुप्पट अनामत रक्कम घेण्यास मुभा देण्यात आली आहे.
  • नवीन कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरू यांच्या वाद झाल्यास त्वरित तोडगा काढण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • करार संपल्यास भाडेकरूंना घर रिकामे करावे लागणार आहे.
  • घरमालकाच्या परवानगी शिवाय घरातील कोणताही भाग किंवा घर वापरायला देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
  • घरमालक भाडेकरूना अचानक घर खाली करण्यासाठी दबाव टाकू शकत नाहीत. घर खाली करावयाचे असल्यास त्याआधी भाडेकरूला नोटीस द्यावी लागणार आहे.
  • ज्या भाड्याच्या घरात भाडेकरू राहत आहे त्या घराची देखरेख करण्याची जबाबदारी भाडेकरूची असणार आहे.

    हेही वाचा – Reliance उद्योग समूहाची Family Support Scheme ची घोषणा, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ५ वर्षांचा पगार

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -