घरदेश-विदेशदंतेवाड्यात पुन्हा नक्षलवादी हल्ला; जवानासह ४ जणांचा मृत्यू

दंतेवाड्यात पुन्हा नक्षलवादी हल्ला; जवानासह ४ जणांचा मृत्यू

Subscribe

छत्तीसगडमध्ये १० नोव्हेंबरला पहिल्या टप्पाचे मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरुच आहे. दरम्यान आज सीआयएसएफच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका जवानासह ४ जणांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये एक सीआयएसएफचा जवान शहीद झाला तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक आणि दोन सीआयएसएफचे जवान जखमी झाला आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमध्ये १० नोव्हेंबरला पहिल्या टप्पाचे मतदान होणार आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएमडीसीची बस दुपारी आकाशनगरवरुन बचेलीला भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. यामध्ये सीआयएसएफचे काही जवान देखील होते. भाजी खरेदी केल्यानंतर बस आकाशनगरला परत निघाली होती. त्यावेळी आकाशनगरच्या सहा नंबर रोडवर नक्षलवाद्यांनी सुरुंगाचा स्फोट केला. या स्फोटामध्ये सीआयएसएफचा एक जवान, बस चालक, परिचालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमध्ये असणारे इतर दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना बचेली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान मृतांची ओळख पटलेली नाही.

मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवसआधी हल्ला

नक्षलवाद्यांनी हा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी केला आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ नोव्हेंबरला छत्तीसगडला येणार आहेत. उद्या नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यातील जगदलपूरमध्ये मोदींची सभा होणार आहे. १० नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबरला बिलासपूर आणि रायगडमध्ये जाणार आहे. त्याठिकाणी देखील त्यांची सभा होणार आहे.

- Advertisement -

दूरदर्शनच्या गाडीवर केला होता हल्ला

गेल्या १० दिवसांत दंतेवाड्यात सुरक्षा दलांवर हा दुसरा नक्षली हल्ला आहे. यापूर्वीही ३० ऑक्टोबर रोजी दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी निवडणुकीच्या रिपोर्टिंगसाठी जाणाऱ्या दुरदर्शनच्या गाडीवर हल्ला केला होता. दूरदर्शनच्या टीमसोबत सीआरपीएफच्या जवानांची टीम देखील होती. दरम्यान या हल्ल्यात दोन सीआरपीएफचे जवान आणि दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.

संबंधित बातम्या – 

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

छत्तीसगडच्या ‘या’ गावात फक्त ४ मतदार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलिसांसह कॅमेरामनचा मृत्यू

नक्षली हल्ल्यात बचावलेल्या कॅमेरामनने आईसाठी केला व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -