न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी केलं लॉकडाऊनचं उल्लंघन; पंतप्रधानांनी केली कारवाई

आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी निवेदन देत स्वत:ची चूक मान्य केली आहे.

Prime Minister Jacinda Ardern and health minister Dr David Clarke
डावीकडे पंतप्रधान जसिंदा आर्दन आणि उजव्या बाजूला आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क

जगभरात कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक देश सध्या लॉकडाऊन स्थितीत आहेत. न्युझीलंडने देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन केला आहे. नागरिकांना लॉकडाऊनचं उल्लंघन करु अशी तंबी देण्यात आली आहे. मात्र, न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी या लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क देशात लॉकडाऊन असताना कुटुंबासह बाहेर फिरायला गेले. यावर न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी कारवाई केली आहे.


हेही वाचा – कोरोनाचा प्रसार करण्यात WHO पण जबाबदार; महासंचालकांनी राजीनामा द्यावा, अमेरिकेची मागणी


दरम्यान, आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी निवेदन देत स्वत:ची चूक मान्य केली आहे. लॉकडाऊन असूनही, या कठीण काळात देशाबरोबर उभा राहू शकलो नाही, असे न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी निवेदनात म्हटलं आहे. क्लार्क यांनी निवेदनात म्हटलं आहे की त्या आपल्या घरापासून २० किमी अंतरावर समुद्राच्याजवळ परिवारासोबत फेरफटका मारायला गेलो होतो. त्यांनी पंतप्रधान जसिंदा आर्दन यांना याबाबत माहिती दिली आणि राजीनामा देण्याची कबुली दिली. पंतप्रधान म्हणाले की, जर अशी काही परिस्थिती असती तर मी त्यांना या पदावरून काढून टाकलं असतं. परंतु आता कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याची वेळ आहे. अशा परिस्थितीत ते त्यांचं मंत्रीपद काढून घेत नाही आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे न्यूझीलंडमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे आणि त्याचे स्तर ४ येथे अंमलात आणलं गेलं आहे. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूची १ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.