घरदेश-विदेशबांधकाम क्षेत्राला केंद्राकडून २५ हजार कोटींची मदत

बांधकाम क्षेत्राला केंद्राकडून २५ हजार कोटींची मदत

Subscribe

निर्मला सीतारामन यांनी देशातील तब्बल १६०० पेक्षा जास्त गृहप्रकल्प रखडल्याचे मान्य केले. त्यामुळे या रखडलेल्या घरांच्या बांधकामासाठी त्यांनी २५ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी बांधकाम क्षेत्रासाठी मोठी मदत देण्याची घोषणा केली आहे. सीतारामन यांनी देशातील तब्बल १६०० पेक्षा जास्त गृहप्रकल्प रखडल्याचे मान्य केले. त्यामुळे या रखडलेल्या घरांच्या बांधकामासाठी त्यांनी २५ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या २५ हजार कोटीच्या निधीमध्ये केंद्र सरकारचे १० हजार कोटी तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय जीवन विमा महामंडळ १५ हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

हेही वाचा – नितीन गडकरी, अहमद पटेल भेटीत डील?

- Advertisement -

विशेष खिडकीद्वारे निधी उपलब्ध करणार

गृहप्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होणे जरुरीचे आहे, जेणेकरुन ग्राहकांना लवकरात लवकर घराचा ताबा मिळेल. यासाठी सरकार विशेष खिडकीद्वारे निधी उपलब्ध करणार आहे. यामुळे मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न देखील पूर्ण होईल. याशिवाय निधी उलब्ध करण्याच्या या संकल्पनेमुळे विकसक आणि ग्राहक यांच्यातील विश्वास दृढ होईल. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल आणि अडकलेला निधी हा पुन्हा अर्थव्यवस्थेत उत्पादित स्वरुपात येऊ शकेल. याशिवाय खिडकी योजनामुळे सिमेंट, पोलाद आणि लोखंड उद्योगाला चालना मिळेल. त्याचबरोबर रोजगार निर्मितीही होईल, असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -