घरताज्या घडामोडीडेल्टा-ओमिक्रॉन मिळून तयार होणार धोकादायक व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

डेल्टा-ओमिक्रॉन मिळून तयार होणार धोकादायक व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हळूहळू सर्व देशांमध्ये पसरत आहे. ब्रिटनमध्ये या व्हेरिएंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटना आणि वैज्ञानिक या व्हेरिएंटबाबत सातत्याने लोकांना इशारा देत आहेत. मॉडर्ना लस कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. पॉल बर्टन यांनी ओमिक्रॉनबाबत एक नवीन भीती व्यक्त केली आहे. डॉ. पॉल म्हणाले की, जर ओमिक्रॉन आणि डेल्टाची एकाच वेळी लागण झाली तर यामुळे एक नवा सुपर-व्हेरिएंट तयार होण्याची शक्यता आहे.

डॉ. पॉल पुढे म्हणाले की, कोरोना संक्रमणात एकाच वेळी एक म्युटेशन होते, परंतु क्वचित प्रकरणात दोन स्ट्रेन एकाच वेळी हल्ला करतात. जर हे दोन्ही स्ट्रेन एकाला संक्रमित करतात, तर ते डीएनएची अदला-बदलही करतात आणि एकत्र मिळून व्हायरसचा नवा व्हेरिएंट तयार करू शकतात.

- Advertisement -

सायन्स अँड टेक्नोलॉजी कमेटीला संबोधित करताना डॉक्टर पॉल म्हणाले की, हे निश्चितपणे शक्य आहे की, हे दोन्ही स्ट्रेन जीनची अदला-बदली करू शकतात आणि आणखीन एक धोकादायक व्हेरिएंटला जन्म देऊ शकतात. आतापर्यंत जीनच्या अदला-बदलामुळे बनलेले फक्त तीन स्ट्रेनची नोंद करण्यात आली आहे. जास्त करून प्रकरणात व्हायरस स्वतः म्युटेट होऊन नवा व्हेरिएंट बनवतो.

दरम्यान लंडनमध्ये दोन आठवड्यातच ओमिक्रॉनचा अधिक प्रभाव झाला आहे. त्यामुळे नव्या वर्षात लंडनमध्ये सर्वत्र ओमिक्रॉन पसरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉन विरोधात भारतातील लस प्रभावी नाही, Task Force चे चिंता वाढवणारे वक्तव्य


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -