घरअर्थजगतIPPB Account: घर बसल्या उघडा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं, जाणून घ्या...

IPPB Account: घर बसल्या उघडा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं, जाणून घ्या प्रक्रिया

Subscribe

आता घर बसल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (India Post Payment Bank) सहज खातं उघडता येणार आहे. आयपीपीबी या मोबाइल अ‍ॅपद्वारे डिजीटल बचत खाते उघडण्याची सुविधा प्रदान करत आहे. पोस्ट ऑफिस खातेदार IPPB mobile app द्वारे मूलभूत बँकिंग व्यवहार सहजपणे करू शकणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना बॅलन्स चेक करणं, मनी ट्रान्सफर आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागत होते. आता India Post Payment Bank च्या माध्यमातून ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध होत असल्याने खूप मदत झाली आहे.

त्यामुळे आता तुम्ही घर बसल्या आयपीपीबी हे अ‍ॅप डाउनलोड करू करून त्याद्वारे आयपीपीबी खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी, अर्जदार १८ वर्षांपेक्षा अधिक असण्यासह भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिजिटल बचत खाते केवळ एका वर्षासाठी वैध असणार आहे. खाते उघडण्याच्या एका वर्षाच्या आत तुम्हाला त्या खात्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे, त्यानंतर ते नियमित बचत खात्यात रूपांतरित होईल. खाते उघडण्यासाठी जाणून घ्या प्रक्रिया…

- Advertisement -
  • तुमच्या मोबाइल फोनमध्ये आयपीपीबी मोबाइल बँकिंग अॅप डाउनलोड करा. यानंतर आयपीपीबी मोबाइल बँकिंग अ‍ॅप उघडा आणि ‘Open Account’ वर क्लिक करा.
  • आता येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल.
  • पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर नोंद केल्यानंतर तुम्हाला लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल. त्या ओटीपीची नोंद करा.
  • आता तुम्हाला तुमच्या आईचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी इत्यादी तपशील द्यावा लागणार आहे.
  • ही माहिती दिल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. याद्वारे खाते उघडले जाईल.
  • तुम्ही हे बँक खाते अ‍ॅपद्वारे कमी कालावधीत ओपन करू शकता.

मुंबईत अतिवृष्टीचा RED अलर्ट Orange का झाला? IMD चे स्पष्टीकरण

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -