घरदेश-विदेशTarek Fatah Passed Away : स्वतःला भारतीय म्हणवून घेणारे पाकिस्तानी लेखक तारिक...

Tarek Fatah Passed Away : स्वतःला भारतीय म्हणवून घेणारे पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांच निधन

Subscribe

पाकिस्तानी वंशाचे लेखक आणि पत्रकार असलेले पण स्वतःला भारतीय म्हणवून घेणारे तारिक फतेह हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कॅन्सर या आजाराशी त्यांचीै झुंज अपयशी ठरली असून त्यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते.

पाकिस्तानी वंशाचे लेखक आणि पत्रकार असलेले पण स्वतःला भारतीय म्हणवून घेणारे तारिक फतेह (Tarej Fatah Passed Away) हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कॅन्सरशी दोन हात करत होते. पण अखेरीस त्यांची या आजाराशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांच्या निधनाची माहिती त्यांची मुलगी नताशा फतेह हिने ट्वीट करत दिली. तारिक फतेह हे कायमच भारताच्या बाजूने बोलताना दिसून आले. त्यामुळे ते पाकिस्तानी वंशाचे असताना देखील भारताचे गोडवे गात असल्याने त्यांच्यावर कायमच टीका करण्यात आली. तर त्यांनी अनेकदा इस्लाम धर्माशी संबंधित मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडल्याने त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती.

नताशा फतेह हिने ट्वीट करत दिली निधनाची बातमी
तारिक फतेह यांची मुलगी नताशा फतेह हिने त्यांच्या निधनाची बातमी दिली. तिने याबाबत ट्वीट करत लिहिले की, “पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनडा प्रेमी, सत्य वक्ता आणि न्यायाच्या बाजूचा योद्धा तारेख फतेह यांचं निधन झाले. त्यांचे विचार लोकांच्या माध्यमातून जिवंत राहतील”

- Advertisement -

कोण होते तारिक फतेह?
तारिक फतेह यांचा जन्म 1949 मध्ये कराची येथे झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणी होण्याआधी त्यांचे कुटुंब हे मुंबईत वास्तव्याला होते. पण फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने कराची गाठून ते तेथेच स्थायिक झाले. त्यांनी पाकिस्तानमध्ये शोध पत्रकारिता केली होती. तर त्यांनी 1970 मध्ये ‘सन’ नावाच्या वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. पत्रकारिता करत असताना त्यांना दोनदा तुरूंगातही जावे लागले होते.

- Advertisement -

तारिक फतेह यांनी 1987 मध्ये पाकिस्तान सोडून कॅनडामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ते तेथे जाऊन स्थायिक झाले. कॅनडात पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यांनी केलेल्या लिखाणावर अनेकदा चर्चा देखील होत असे. त्यामुळे सोशल मीडियावर कायमच त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग पाहायला मिळाला.

हेही वाचा – मॉरिशसमधील मराठी भवनाला मुख्यमंत्र्यांतर्फे देणगी – देवेंद्र फडणवीस

तारिक फतेह हे स्वतःला भारतीय सांगत असे. ते कायमच पाकिस्तानमधील कट्टर इस्लाम धर्म आणि आतंकदावर निर्भीडपणे बोलताना दिसून आले. पाकिस्तानच्या अनेक गोष्टींचा त्यांनी विरोध देखील केला, ज्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. तर दुसरीकडे नेहमीच भारताचे गोडवे गाताना दिसले. त्यांनी अनेकदा केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक केले होते. हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी आणि अरबी या भाषांसहित त्यांचे आणखी काही भाषांवर प्रभुत्व होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -