घरदेश-विदेशइंग्रजी भाषा बोललात तर भरावा लागणार दंड; 'या' देशातील सरकारने घेतला निर्णय

इंग्रजी भाषा बोललात तर भरावा लागणार दंड; ‘या’ देशातील सरकारने घेतला निर्णय

Subscribe

इटली देशातील सरकार लवकरच इतर परदेशी भाषांसह इंग्रजी भाषेवर बंदी घालणार आहे. पण जर का तेथील नागरिकांनी इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधला हा नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून मोठा दंड आकारण्यात येणार आहे.

इंग्रजी ही एक अशी भाषा आहे, जी जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही देशात बोलण्यात येते. त्यामुळे आपल्या मातृभाषेशिवाय इंग्रजी जरी आपल्याला आली तरी आपण परदेशात फिरायला मोकळे असाच विचार करतो. पण असे काही देश आहेत, जिथे इंग्रजी फार क्वचित बोलली जाते. मात्र, आता एका देशामध्ये इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. इटली देशातील सरकार लवकरच इतर परदेशी भाषांसह इंग्रजी भाषेवर बंदी घालणार आहे. पण जर का तेथील नागरिकांनी इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधला हा नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून मोठा दंड आकारण्यात येणार आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इटलीत वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीने अधिकृत संभाषणात इतर कोणतीही परदेशी भाषा किंवा विशेषतः इंग्रजी भाषेचा वापर केल्यास त्या व्यक्तीला 1 लाख युरो (भारतीय चलनातील जवळपास 89 लाख रुपये) इतका दंड आकारण्यात येऊ शकतो. यासाठी इटलीत एक नवीन कायदा काढण्यात येणार असल्याची माहिती देशाच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

इटलीतील सरकारच्या मतानुसार, परदेशी भाषा किंवा इंग्रजी भाषा यांमुळे इटालियन भाषेचा अपमान होतो. त्यामुळे या भाषेविरोधात या सरकारने विधेयक सादर केलेले होते. पण हे विधेयक परदेशी भाषांबद्दल आणि इंग्रजी भाषेबद्दलचे होते. इटलीच्या कनिष्ठ सभागृहात राजकारणी फॅबियो रॅम्पेली यांनी हे विधेयक सादर केले. पण अद्याप या विधेयकाबाबत इटलीतील संसदेत चर्चा करण्यात आलेली नाही. पण देशात जर का हा कायदा लागू झाला तर अधिकृत कागदपत्रांमध्ये देखील इंग्रजी भाषा वापरण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

इटली देशात कार्यरत असलेल्या कंपन्यांना देखील हा कायदा लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मसुद्याच्या कायद्यानुसार, परदेशी संस्थांचे सर्व अंतर्गत नियम आणि रोजगार करार हे इटालियन भाषेत असणे आवश्यक आहे. हे केवळ फॅशनशी संबंधित नाही. जर इटालियन भाषेचा व्यावसायिक स्तरावर वापर करण्यात आला नाही तर युरो 5,000 ते युरो 100,000 च्या दरम्यान दंड होऊ शकतो, असे देखील या मसुद्यात लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मसूरी-देहरादून महामार्गावर बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -