घरदेश-विदेशलॉकडाऊनमध्ये धार्मिक सोहळ्याला आवर्जून हजेरी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

लॉकडाऊनमध्ये धार्मिक सोहळ्याला आवर्जून हजेरी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

Subscribe

कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिराशी संबंधित आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिक सहभागी

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी लोकं गर्दी करण्याचे टाळत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये निझामुद्दीनमध्ये तबलीगी जमात मरकझचा धार्मिक कार्यक्रमात हजारोंची उपस्थिती असो किंवा मुंबईतील वांद्रेमध्ये स्थलांतरित शेकडो मजुरांनी केलेले आंदोलन असो. या ताज्या घटनांनंतर आता कलबुर्गीमधील एका धार्मिक सोहळ्यात शेकडो नागरिकांनी हजेरी लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये धार्मिक कार्यक्रम संपन्न

कर्नाटकच्या चिकबल्लापूरमध्ये ६५ वर्षाच्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कर्नाटकमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १२ वर पोचली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या १९ नव्या रूग्णांची भर पडून आता ही संख्या २७९ झाली आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे उल्लंघन करून कलबुर्गीत धार्मिक कार्यक्रम पार पडला. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिराशी संबंधित आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यात महिलासह मुलांचाही समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितापूरमधील धार्मिक कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. अनेकजण मास्कशिवाय कार्यक्रमात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कर्नाटकातील कलबुर्गी हा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट घोषित झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले असताना देखील आजच हा कार्यक्रम पार पडला आहे.

- Advertisement -

उप-निरीक्षक अधिकारी निलंबित

आज सकाळी ६.३० वाजता साधारण १०० ते १५० लोक २० मिनिटांसाठी सिद्धलिंगेश्वर मंदिराजवळ आले. यावेळी असणाऱ्या रथ ओढण्याच्या मिरवणुकीत त्यांनी सहभाग घेतला होता. लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २० जणांविरोधात नामनिर्देशित अहवाल दाखल करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान इतकी मोठी गर्दी आल्याबद्दल उपनिरीक्षक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.


CoronaVirus: गुजरातच्या वैज्ञानिकांना मोठं यश; कोरोना विषाणूच्या डीएनएची संरचना समजली!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -